संजीवनी उद्योग समूह

संजीवनी एमबीए व इंजिनिअरींगच्या तिन विद्यार्थ्यांची अवलारा कंपनीत वार्षिक पॅकेज रू ११. ८३ लाखांवर नोकरीसाठी निवड

0 5 3 7 0 6

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

संजीवनी एमबीए व इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या संयुक्तिक प्रयत्नाने अलिकडेच अवलारा कंपनीने घेतलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये दोन एमबीए व एक कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाच्या विद्यार्थ्यांची वार्षिक पॅकेज रू ११. ८३ लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनीचे विविध विभाग व टी अँड यांचे जॉब रेडी विद्यार्थी घडविण्यासाठीचे संयुक्तिक प्रयत्न आणि नामांकित कंपन्यांची संजीवनीवर असलेली विश्वासहर्ता यातुन दरवर्षी शेकडो ग्रामीण विद्यार्थी लाखो रूपयांच्या पॅकेजचे मानकरी बनत आहे, अशी माहिती संजीवनीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

मी अकोले तालुक्यातील मेहंदुरी गावच्या शेतकऱ्याची मुलगी. आई गृहिणी आहे. मी शिकून स्वावलंबी व्हावे, ही आई वडीलांची प्रबळ इच्छा होती. कोणते कॉलेज आपल्या मुलीला स्वावलंबी बनवेन याचा बारकाईने अभ्यास करून वडीलांनी मला संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये दाखल केले. कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागात आधुनिक तंत्रज्ञान मिळाले. टी अँड पी विभागाने सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण देवुन जोपर्यंत कंपनीच्या कसोटीत पात्र होत नाही तो पर्यंत मॉक इंटरव्ह्यूज (सराव मुलाखती) घेतल्या आणि मला सक्षम केले. त्यामुळे कंपनीच्या सर्व प्रश्नांची मी आत्मविश्वासाने उत्तरे देवु शकले आणि वार्षिक पॅकेज रू ११. ८३ लाख मिळविले. याचा आमच्या सर्व कुटूंबियांना व नातेवाईकांना मोठा आनंद झाला. विशेष म्हणजे मी आमच्या परीवारातील नोकरीसाठी बाहेर पडणारी पहिली मुलगी ठरली आहे. माझ्या शेतकरी वडीलांचे स्वप्न संजीवनीमुळे पुर्ण झाले.-अभियंता मुलगी प्रांजल आरोटे

पत्रकात पुढे म्हटले आहे की जगातील चार खंडात आपल्या कार्याचा विस्तार असलेल्या अवलारा टेक्नॉलॉजिज प्रायव्हेट लिमिटेड या सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने एमबीएच्या तुषार ज्ञानेश्वर बनकर, हर्षल विजय गरदारे व कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या प्रांजल प्रकाश आरोटेची नोकरीसाठी त्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच निवड केली आहे.संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी तिनही निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तसेच संबधित विभाग आणि टी अँड पी च्या टीमचेही अभिनंदन केले.

जाहिरात
जाहिरात
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
01:17