महाराष्ट्र

शिर्डी हत्याकांडातील २ आरोपींन विरुध्द मोक्का कायदयातंर्गत कारवाई

0 5 3 4 1 8

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

शिडी पोलीस स्टेशन हददीत सोमवार दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास मयत इसम सुभाष साहेबराव घोडे, वय ४५ वर्षे, रा.करडोबानगर, शिर्डी, ता.राहाता,जि. अहिल्यानगर हे त्यांचे मोटार सायकलवरून श्री.साईबाबा संस्थान शिडी येथे डयुटीला जात असतांना दोन आरोपींनी लुटमार करण्याच्या उद्देशाने त्यांची मोटार सायकल अडवुन त्यांचा खुन केला होता.याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ५३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १२६, ३०९(६), ३११, ३१२, सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ चे कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाच्या तपासात या गुन्ह्यातील आरोपी राजु उर्फ शाक्या अशोक माळी, वय २९ वर्षे, रा.गणेशवाडी शिडी,ता. राहाता, जि.अहिल्यानगर, व दुसरा आरोपी किरण ज्ञानदेव सदाफुले, वय २६ वर्षे, रा. श्रीरामनगर,शिर्डी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जाहिरात
जाहिरात

त्यानुसार नमुद दाखल गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ मधील वाढीव कलम लावण्याची परवानगी मिळणे बाबतचा प्रस्ताव मा.विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांना गुन्हयाचे तपासी अधिकारी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी सादर केला होता.त्याप्रमाणे मा.विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५३/२०२५भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), १२६, ३०९(६), ३९९, ३१२, सह भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ चे कलम १४२ या गुन्हयातील आरोपी राजु उर्फ शाक्या अशोक माळी,

जाहिरात
जाहिरात 

व दुसरा आरोपी किरण ज्ञानदेव सदाफुले या दोघांन विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (i), ३(२) व ३ (४) असे वाढीव कलम लावण्याबाबत वरिष्ठांकडून परवानगी मिळाल्याने तसेच सदरच्या गुन्हयास दिनांक ०६ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ चे वाढीव कलम लावले असून सदर शिर्डी हत्याकांडातील दोन्ही आरोपींन विरुध्द मोक्का कायदयातंर्गत कारवाई करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 4 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे