प्रत्येकांने जीवनांत राजहंसा सारखी वृत्ती ठेवावी -साध्वी सोनाली दिदी कर्पे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
जीवनांत प्रत्येकांने राजहंसा सारखी वृत्ती ठेवावी, नको ते टाकुन द्या आणि चांगलं ते आत्मसात करा, आई-वडील आणि गुरूंचे अनन्य साधारण महत्व असुन त्यांची सेवा करा, दैनंदिनअडचणींवर मात करण्यांसाठी गुरूबळ महत्वाचे असते, कधीही रागात बोलु नका, दुःखात कुठला निर्णय घेवु नका आणि आनंदात असतांना कुणांला शब्द देवु नका असे प्रतिपादन साध्वी सोनालीदिदी कर्पे यांनी केले. भगवंत सुध्दा गुरूंना नेहमी मान देतात.शहरातील संत ज्ञानेश्वरनगरी तहसिल कार्यालय मैदानावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या तिस-या पुण्यतिथीनिमीत्त कल्याणस्वामी संस्थान चकलंबा (गेवराई-बीड) अन्नपुर्णा माता महिला वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापिका, साध्वी सोनालीदिदी कर्पे यांच्या रसाळवाणीतुन संगीतमय प्रभु श्रीरामकथेचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे तिसरे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या.
सुदर्शन महाराज यांनी कार्यक्रमस्थळी रामायण कथेतील हुबेहूब पात्रे झाकीद्वारे साकारली, सीता स्वयंवरातील प्रसंग संपूर्ण परिवार, अक्षदा, फुलांची मुक्त उधळण, फटाक्यांची जोरदार आतषबाजी, धनुष्य परीक्षा यामुळे भाविकांना राम कथेतील जिवंतपणा अनुभवायला मिळाला., किरण कुलकर्णी यांनी बहारदार मंगलाष्टके म्हटली. संजीवनी व प्रतिष्ठान सेवकांनी वऱ्हाडी भाविकांना पेढ्यांचा प्रसाद वाटला.
प्रारंभी कृषी संशोधक दत्तात्रय गेनूजी कोल्हे यांनी सपत्नीक रामायण ग्रंथ व साध्वी सोनालीदिदी कर्पे यांचे पुजन केले. माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे, सौ. रेणुका कोल्हे व सौ. श्रध्दा कोल्हे, सुरेशअंकल कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.गेवराई बीड येथे कल्याणस्वामी संजीवन समाधी मंदिराचा जिर्णोध्दार सुरू आहे, याशिवाय तेथे राज्यातील पहिली मुलींची अन्नपुर्णामाता महिला वारकरी शिक्षण संस्था स्थापन करण्यांत आली असुन ३०० पेक्षा अधिक मुली किर्तन प्रवचन, भजन आदि अध्यात्माचे शिक्षण घेत आहे तेंव्हा दानशुरांनी या कामास सढळ हाताने मदत करावी असे आवाहन साध्वी सोनालीदिदी कर्पे यांनी यावेळी बोलतांना केले.त्या पुढे म्हणाल्या की, सुवर्ण, चांदी, अन्न, वस्त्र, गुळ, मीठ, तीळ, कन्या, भू (जमिन), गाय, धन, फळ हया बारा प्रकारच्या दानातुन पुण्य संचय वाढतो.

एक वचनी मर्यादापुरुषोत्तम आणि महादेव यांचे अतुट नाते असुन हे दोघेही एकमेकांशिवाय राहु शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात धन दौलत, समृध्दी, आरोग्य सुख-समृध्दी, संतती, कुटुंबप्रेम यासाठी महादेव सेवेला महत्व द्या.माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांव मतदार संघातील शेती सुजलाम सुफलाम करण्यासाठी पाणी प्रश्नाची सोडवणुक करत तुम्हां आम्हांस अल्हाददायक हिरवळीला जीवंत ठेवण्यांचे काम केले, त्यांच्याबाबतीत अष्टपैलु नेर्तुत्व, अमुल्य हिरा, पाणीदार नेता, संघर्षशील कर्तृत्व अशी कितीही विश्लेषणे लावली तरी ती कमीच आहे.त्यांची दुसरी आणि तिसरी पिढी स्व.शंकरराव कोल्हे यांच्या समाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत आहे.

दिवसेंदिवस परिवारातील संवाद हरवत चालल्यांने एकमेकाबददलची प्रेमभावना कमी कमी होवु लागली आहे, अभासी तंत्रज्ञानाने मानवाच्या जीवनाचा कब्जा घेतला आहे, घरातील प्रत्येकाच्या हातातील भ्रमणध्वनीची संख्या वाढु लागली आहे, काय पहायचे हे आता आपल्या हातात राहिले नाही, वाईट विचारांचा प्रभाव वाढतो आहे, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की माणसं बधीर होवु लागली आहेत. चागंलं करण्यासाठी अनंत काळाची प्रतिक्षा करावी लागते पण वाईटासाठी सगळी बिन बोलावता एकत्र येवु लागली आहे, आपलीच माणसं आपल्या माणसांला वेळ द्यायला तयार नाही. घरातला चक्कर येवुन पडला तरी आपण पाचशे-हजार किलोमीटर दूर अंतरावरील व्यक्तींच्या नको त्या चौकशात वेळ घालवत आहोत.
श्रध्दा कधीही बदलत नसते आणि जी बदलते ती श्रध्दा होवु शकत नाही. समर्पण सेवाभाव निष्ठा प्रामाणिकपणांतुन ईश्वरीसेवेला प्रत्येकाने वेळ द्यावा. कुणाचं चांगलं करता आले नाही वाईट कधीच करू नये. ज्यांच्यात सदगुरू विकसीत होतात तोच ईश्वराचा अंश आहे. निंदा नालस्ती करण्यासाठी जीवन नाही, चष्मा बदला चांगलं होईल असे त्या शेवटी म्हणाल्या.कोपरगांव शहर व तालुका पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या शेकडो पदाधिकारी-भाविकांच्या हस्ते आरती करण्यांत आली.
महिलांची उपस्थिती लक्षणीय होती त्यामुळे कथा श्रवणासाठी मैदान अपुरे पडले. हिरव्या रंगाचे वस्त्र परिधानामुळे भाविकांच्या संपन्नतेचे दृष्य खुलून दिसत होते अनेकांनी हा प्रसंग स्वतःच्या भ्रमणध्वनीत साठवून ठेवला. नियोजनात कुठेही कमतरता भासणार नाही यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे सतत काळजी घेतांना दिसत होते.