संजीवनी उद्योग समूह

श्रीरामकथेसाठी आत्मिक श्रध्दा असावी त्याशिवाय गोडी नाही – साध्वी सोनालीदिदी कर्पे

0 5 3 8 2 6

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

मानवी जीवनाचा प्रवास खडतर आहे, पण परमेश्वरी सेवेतुन त्यातील अडचणींवर उपाय सापडतो, पती-पत्नी हे विश्वासाचं नातं आहे, प्रत्येकाला वाटतं देवाने आपल्या घरी यावं पण त्यासाठी श्रध्देची प्रतिक्षा महत्वाची असते, कोपरगांव शहर आणि तालुका हा अनेक संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असुन गोदावरी नदी काठी श्रीरामकथा होत आहे हे तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे, या कथेसाठी श्रध्दा महत्वाची त्याशिवाय गोडी नाही असे प्रतिपादन साध्वी सोनालीदिदी कर्पे यांनी केले, शहरातील संत ज्ञानेश्वरनगरी तहसिल कार्यालय मैदानावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या तिस-या पुण्यतिथीनिमीत्त कल्याणस्वामी संस्थान चकलंबा (गेवराई-बीड) अन्नपुर्णा माता महिला वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापिका, साध्वी सोनालीदिदी कर्पे यांच्या रसाळवाणीतुन संगीतमय प्रभु श्रीरामकथेचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे राम जन्मावरील दुसरे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या.

जाहिरात
जाहिरात

प्रारंभी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्थ सुमितदादा कोल्हे यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पुतळयास पुष्पहार अर्पण करून विधिवत पुजन करण्यांत आले, सौ. श्रध्दा व ईशान बिपिनदादा कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून रामायण ग्रंथ व साध्वी सोनालीदिदी कर्पे यांचे पुजन केले. साध्वी सोनालीदिदी कर्पे यांनी श्रीरामकथेतुन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्त त्यांच्या शौर्य पराक्रमाची माहिती देवुन मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची यशस्वी उभारणी केली. महाराजांनी महाराष्ट्र राज्याची अस्मिता कायम ठेवत स्वाभीमानाची शिकवण दिली. मॅनेजमेंटचे गुरू म्हणून त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असुन युवकांनी त्यांचा वारसा पुढे चालवावा, असे सांगून त्या पुढे म्हणाला की, सहजच कधी माणसं मोठी होत नाही तर ती विचाराने मोठी होतात त्यात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा उल्लेख केल्यास वावगे ठरू नये.कोपरगांवकरांना कुटूंब मानत त्यांची आयुष्यभर सेवा केली, स्वकर्तृत्वावर त्यांनी देश-विदेशातही साखर उद्योगात आधुनिक बदलांची शिकवण देत शेतकरी वर्गासह त्यावर अवलंबुन असणा-या अनेक छोटया छोटया घटकांची काळजी घेतली म्हणूनच त्यांचा सर्वत्र जयघोष आहे.

जाहिरात
जाहिरात

व्यक्ती देह सोडुन गेला तरी त्याच्या कार्य-कर्तृत्वांचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो.सुदर्शन महाराजांच्या झाकीने श्रीराम जन्माचा जीवंत देखावा यावेळी सादर करण्यांत आला. ताला-सुरांत व लयबध्दतेंने साध्वी सोनालीदिदी कर्पे यांच्या राम महाराज लाहुडकर (बासरी), गोपाल महाराज मोहे (सिंथेसायझर), सोपान महाराज पारसे (शहनाई), वैभव महाराज पांचाळ (तबला), रितेश महाराज पाटील (अपपॅड), उमेश महाराज पांचाळ (ढोलक), भालीकाताई भगत (मृदुंग) संगीत समुहांने बहारदार साथ दिली तर अन्नपुर्णमाता महिला वारकरी शिक्षण संस्था चकलंबाच्या ज्ञानेश्वरीताई म्हसे, अपेक्षाताई पवार, राधीकाताई घुगे यासह अन्य विद्यार्थीनींनी गोड आवाजात रामकथा संगीतमय भजने गायली. महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. शेवटी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सेवकांनी राम जन्माबददल उपस्थितांना खडीसाखरेचा महाप्रसाद वाटप केला. अवकाशात बहारदार फटाक्यांची आतषबाजी करण्यांत आली. पुरूषांनी पिवळया पोषाखात तर महिलांनी पिवळया साडीत फेर धरून नाचत फुगडया खेळत रामजन्माचा मनसोक्त आनंद लुटला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे