शांताराम रणशूर यांना लिमरा आंतरराष्ट्रीय संस्थेने केले सन्मानित

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
लाइफ इन्शुरन्स मार्केटिंग अँड रिसर्च असोसिएशन ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून ती संस्था लाईफ इन्शुरन्स आणि वित्तीय सेवा कंपन्यांसाठी संशोधन करते तसेच लिमरा ही संस्था कन्सल्टिंग आणि व्यावसायिक विकास सेवा देखील ग्राहकांना प्रदान करते तसेच ग्राहक,बाजारपेठ, अर्थशास्त्र, वित्त, मनुष्यबळ आणि मानवी साधनांवर संशोधन करणारी ही संस्था आहे तसेच जीवन विमा आणि वार्षिकी व्यावसायिकांसाठी ही संस्था प्रदान करते अशा या संस्थेच्या वतीने कोपरगाव एल.आय.सी शाखेतील विमा प्रतिनिधी व सीएम क्लब मेंबर शांताराम रणशूर यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा लिमरा या संस्थेचे चेअरमन यांच्या स्वाक्षरीने शांताराम रणशूर यांना कोपरगाव शाखेचे मुख्य शाखाधिकारी विकास कुमार दुबे उपशाखाधिकारी ज्योती रावत तसेच सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आरती सुंडाळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे विकास अधिकारी व्ही.जी कदम यांचे रणशूर यांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शक लाभले त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून शांताराम रणशूर यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.