एस.एस.जी.एम महाविद्यालयात संगणक विज्ञान विभाग आयोजित प्रश्नमंजुषा उपक्रम संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स ॲन्ड संजिवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील संगणक विज्ञान विभागाने दि.१५ फेब्रुवारी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक संगणक दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात संगणक विज्ञान विभागाच्या वतीने प्रश्नमंजुषा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.उद्घाटन पर मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, प्रश्नमंजुषा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होऊन त्यांच्या कलागुणांना भाव मिळतो तसेच ए. आय. तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांमध्ये समय सूचकता, आकलन क्षमतेमध्ये वाढ, विचारशक्ती वाढीस लागते त्यामुळे आजच्या काळात त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास व्हावा म्हणून महाविद्यालयातील संगणक ज्ञान विभागाने या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे असे सांगितले.”या स्पर्धेमध्ये विभागातील एकूण 15 संघानी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये प्रा. उत्तम गवळी, प्रा. संजय गायकवाड व प्रा. पी. एस. लोढा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर अनुक्रमे quizzical coders या संघाने प्रथम, तर द्वितीय व तृतीय infinity,code burnter या संघानी मिळवला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संगणक विज्ञान विभाग प्रमुख प्रा.दादा वैराळ यांनी करून दिला तर सदर उपक्रमासाठी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. गोरख सांगळे, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब शेंडगे,वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत,आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. निलेश मालपुरे, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख डॉ. घनश्याम भगत,प्रा.हृषीकेश सोनवणे,प्रा. सौ.प्रतीक्षा रोहोम, प्रा.प्रसाद हाडोळे, प्रा.सौ.प्रज्ञा आव्हाड,प्रा.सौ.राजश्री जाधव,प्रा. काजळ साळुंके, प्रा.चेतना काळे यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. साक्षी सवई हिने केले, तर आभार कु.पल्लवी आहेर हिने मानले.