संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

डॉ.ए.जी.ठाकुर यांची संजीवनी विद्यापीठाचे पहिले व्हाईस चांसलर म्हणुन निवड

0 5 4 0 0 2

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये सन १९८९ पासुन डॉ. ए. जी. ठाकुर यांनी लेक्चरर, प्राद्यापक, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे विभाग प्रमुख, वसतिगृहांचे चिफ वार्डन ते संजीवनी इंजिअिरींग कॉलेज या ऑटोनॉमस संस्थेचे डायरेक्टर पदे भुषविली . त्यांच्या कामातील समर्पण, त्यांच्यातील नेतृत्व गुण आणि त्यांच्याकडून विद्यार्थी व संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, इत्यादी बाबींमुळे डॉ. ठाकुर यांनी शैक्षणिक जगतात एक आगळी वेगळी निर्माण केली. संजीवनी शैक्षणिक संकुलाने वेगवेवेगळ्या क्षेत्रात दर्जा आणि गुणवत्तेच्या जोरावर देश परदेशात नवनवीन कीर्तिमान स्थापित केले. आता मागील वर्षापासून संजीवनी युनिव्हर्सिटी या स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना करून जणु काही ग्रामिण मुळापासुन ते जागतिक अंकुरापर्यंतचा प्रवास केला आहे. डॉ. ठाकुर यांची प्रदिर्ध सेवा आणि कार्य करण्याच्या हातोटीने निवड मंडळाने त्यांची संजीवनी युनिव्हर्सिटीच्या पहिल्या संस्थापक व्हाईस चांसलर पदावर निवड केल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिकृत सुत्रांनी पसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.संजीवनी विद्यापीठाचे चेअरमन नितिनदादा कोल्हे यांनी ठाकुर यांचा व्हाईस चांसलर पदी निवड झाल्यााबध्दल अभिनंदन केले. तसेच विद्यापीठाचे प्रसिडेंट अमित कोल्हे यांनी डॉ.ठाकुर याचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळी संजीवनी सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ.शांतंम शुक्ला व चिफ टेक्निकल हेड विजय नायडू उपस्थित होते.संजीवनी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक, माजी मंत्री, समाजीक-आर्थिक क्रांतीचे जनक स्व. शंकरराव कोल्हे यांनी मागील ४० वर्षांपासून ग्रामीण विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवुन देश परदेशात मोठे नोकरदार अथवा उद्योजक बनवुन ग्रामीण अर्थकारणाला चालना दिली आहे. तोच वारसा नितिनदादा कोल्हे व अमित कोल्हे यांनी समर्थपणे चालविला आहे. या सर्व संक्रमण अवस्थांचे डॉ. ठाकुर हे साक्षिदार राहीले असुन काही उपक्रमांमधिल ते महत्वपुर्ण भागही राहिले आहे. डॉ.ठाकुर यांची संजीवनी विद्यापीठाच्या व्हाईस चांसलर पदी निवड होणे, ही बाब त्यांच्या निष्ठेचे प्रतिबिंब मानले जात आहे.संजीवनी विद्यापीठाने ‘रूरल टू ग्लोबल’ नावलौकिक मिळविण्याचा विश्वास दाखविला आहे. त्यासाठी सुरूवातीपासुनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी देश परदेशातून उच्च दर्जाच्या प्राद्यापकांची नेमणुक येथे केली आहे. निवड मंडळाने डॉ.ठाकुर यांची संजीवणी विद्यापीठाच्या ‘व्हाईस चांसलर’ पदावर निवड केल्याने रूरल टू ग्लोबल हा विश्वास सार्थ ठरेल, असे मत व्यक्त केल्या जात आहे. डॉ. ठाकुर यांच्या निवडीबाबत सर्व स्थरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे