ऐतिहासिक नाणी ही समृद्ध इतिहासाचा एक प्रबळ पुरावा -अॅड.भगीरथ शिंदे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
ज्या प्रमाणे इतिहास लिहिण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असते तसेच नाण्याची सुद्धा आवश्यकता असते. गतकालीन घडामोडींवर प्रकाश टाकण्यासाठी नाणेशास्त्राचा उपयोग होतो. पूर्वीच्या काळी राज्यारोहण, युद्धविजय अशा महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी नवीन नाणी तयार केली जात. त्यावर काही शब्द किंवा प्रतिमा कोरलेल्या असत, त्यावरून त्या काळातील लिपी तसेच धार्मिक संकल्पनाची माहिती मिळते. तसेच नाण्यासाठी वापरलेल्या धातूवरून तत्कालीन आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधता येतो.” असे प्रतिपादन त्यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे इतिहास विभाग आयोजित ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन संपन्न झाले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने भारतीय व आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन भरविले होते. त्यानिमित रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे यांनी प्रदर्शनास भेट दिली त्या प्रसंगी ते बोलत होते.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे म्हणाले की, महेश लाडणे यांनी महाविद्यालयीन जीवनापासून विविध नाणी गोळा करण्याचा छंद जोपासला आहे व ते विविध देशांची नाणी, चलन, शिवपूर्वकालीन नाणी, शिवकालीन नाणी, यांचा त्यांनी संग्रह केलेला आहे आणि हा छंद ते अव्याहत जोपासत आहे परंतु त्यांनी फक्त नाणी संग्रहित करणे हे ध्येय न बाळगता त्यांची ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी व विशेष करून आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाण्याविषयीची माहिती सर्वांना ज्ञात व्हावी यासाठी विविध शाळा महाविद्यालय या ठिकाणी नाण्यांचे प्रदर्शन भरवीत जावे. अशी सदिच्छा व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत इतिहास विभाग प्रा. किरण पवार यांनी केले. या, नाणी संग्राहक महेश लाडणे, आदिनाथ भुजबळ, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब शेंडगे,विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ.मोहन सांगळे वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रदर्शनाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भागवत देवकाते यांनी केले.