ताईबाई पवार यांची शासनाने शौर्य पुरस्कारासाठी दखल घ्यावी- स्नेहलताताई कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथे गोदावरी पात्रात वाहून जाणाऱ्या नागरीकांना वाचवण्यासाठी आपली साडी फेकून प्रसंगावधान राखणाऱ्या ताईबाई छबूराव पवार यांच्या धाडसाची दखल शासनाने घ्यावी.तीन पैकी दोन युवकांना आपल्या जीवाची बाजी लावून ताईबाई यांनी वाचविले आहे.महिला शक्तीची आणि इतर महिलांना अशा बिकट प्रसंगात सामोरे जाण्यासाठी धाडसाची प्रेरणा मिळण्यास ताईबाई यांचे उदाहरण मोठे ठरणार आहे.नदीपात्रात वाहून जाणाऱ्या युवकांना मदतीसाठी अंगावरील साडीचा दोर तयार केला यामुळेच दोन जणांचे प्राण वाचले याची दखल घेऊन शासनाने ताईबाई यांना शौर्य पुरस्कार देण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी मा.आ.सौ.स्नेहलता ताई कोल्हे यांनी केली आहे.या प्रसंगाने सामाजिक संवेदनशीलता अधिक जागृत झाली आहे. नाते गोते नाही तरीही धाडसी मातृत्वाचा प्रत्यय ताईबाई यांच्या रूपाने आला.या धाडसी कार्याबद्दल शौर्य पुरस्कार देण्यासाठी कार्यवाही करून राज्यसरकारने ताईबाई यांची दखल घ्यावी.काही प्रसंगी इतरांना देखील मदतीसाठी धावून जाण्याची प्रेरणा ठरतात त्यातील ही घटना आहे.अतिशय सामान्य परिस्थितीत आपले जीवन जगणाऱ्या या कुटुंबाने नदीपात्रात वाहणाऱ्यांना वाचवण्याची शर्थ केली. ताईबाई यांची प्रेरणा घेऊन आपत्ती किंवा संकटात अडकलेल्यांना मदतीसाठी आपण धावून गेल्यास अनेकांना वाचविले जाईल यासाठी ही दखल महत्वाची ठरणार आहे.तांगतोडे कुटुंबातील तीन व्यक्ती वाहून जात होते त्यातील दोघांना वाचवण्यात ताईबाई यांना यश आले. मात्र संतोष तांगतोडे यांना प्रवाहातून बाहेर पडता आले नाही व त्यांचे निधन झाले.तांगतोडे कुटुंबालाही दुःखद प्रसंगात शासनाने सहकार्य करावे अशी मागणी देखील कोल्हे यांनी शासनाकडे केली आहे.