संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या दोन अभियंत्यांना प्रत्येकी रू ८.५ लाखांचे वार्षिक पॅकेज

0 5 4 1 2 9

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव 

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने अॅप्टिव काम्पोनंटस् प्रा. लि. कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले. त्यात दोन अभियंत्यांची निवड झाली. सुरूवातीस कंपनीने त्यांना वार्षिक पॅकेज रू ८. ५ लाखावर डीझाईन इंजिनिअर पदावर नेमणुक केली आहे. त्यांचा अंतिम निकाल येताच ते कंपनीच्या सेवेत रूजु होणार आहे, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. मुळात संजीवनीच्या व्यवस्थापनाने उद्योग जगत आणि अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था यांच्यातील कमी असलेला किंबहुना काहीसा नगण्य असा समन्वय वेळीच ओळखला आणि हा दुरावा दुर करण्यासाठी उद्योगांच्या गरजेनुसार आधुनिक तंत्रज्ञान अवगत असलेले

आम्ही देसवंडी, ता.राहुरी येथिल रहिवासी असुन शेतकरी आहे. आमची जेमतेम दोन एकर शेती आहे. मी अडाणी असुन माझ्या मुलाने शिकुन चांगली नोकरी करावी, हे स्वप्न पाहुन अतिशय कष्टाने मुलगा दिपकला संजीवनी मध्ये शिकविले. त्यानेही चांगला अभ्यास केला. मला फोन करून सांगायचा की आई काही काळजी करू नको. येथिल शिक्षक भरपुर काळजी घेतात, चांगली तयारी करून घेतात, मला नोकरी येथनुच मिळेल, मग तुला खुप कष्ट करायची गरज पडणार नाही. आणि खरोखरच तसे झाले. मुलाला नोकरी मिळाली, आमच्या कष्टाचे चीज झाले. संजीवनीने आमचे स्वप्न पुर्ण केले.-संगिता विठ्ठल माळी (आई)

तंत्रज्ञ निर्माण करण्यासाठी ऑटोनॉमस दर्जा प्राप्त केला. त्यानुसार आता इंजिनिअर बाहेर पडत असुन मोठ्या प्रमाणात संजीवनीच्या अभियंत्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळत आहेत. अशाच प्रकारे अलिकडेच दिपक विठ्ठल माळी (रा. देसवंडी, ता. राहुरी) व वैष्णवी संजय आहेर (रा. लोणी, ता. राहाता) या दोनही शेतकऱ्यांच्या मुलांना प्रत्येकी रू ८. ५ लाख वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली.संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दोनही विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर यांचे अभिनंदन केले आहे. तसेच चिफ टेक्निकल ऑफिसर विजय नायडू यांनी दिपक, वैष्णवी व त्यांचे पालक विठ्ठल माळी, संगिता माळी, संजय आहेर व सुरेखा आहेर यांचा सत्कार केला. यावेळी विभाग प्रमुख डॉ. डी.बी. क्षिरसागर व डॉ. आर. ए. कापगते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे