कोपरगाव शहरात रविवारी होणार आदर्श सासूंचा सन्मान

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील जेष्ठ नागरिक सेवा मंच व जेष्ठ महिला समितीच्या वतीने रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता कृष्णाई बँक्वेट्स हॉल छत्रपती संभाजी महाराज सर्कल धांरणगाव रोड कोपरगाव या ठिकाणी आदर्श सासू पुरस्कार २०२४ हा सन्मान सोहळा खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष दादा काळे संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी नितीन दादा कोल्हे शिर्डी विभागाचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रमाच्या संचालिका राजयोगिनी सरला दीदी या मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व जेष्ठ महिला समितीच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने “आदर्श सासू पुरस्कार” २०२४ साठी श्रीमती शकुंतलाबाई मोतीलाल शिंगी श्रीमती पुष्पा आत्माराम जोशी श्रीमती कांचनबाई धनालाल काले, सौ शैलाताई पदमाकांत कुदळे, सौ शोभा सुभाष मुंदडा व सौ कलावती नितीन दादा कोल्हे यांची निवड करण्यात आली असून त्यांचा सन्मान सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रविवारी सकाळी ११.०० वाजता संपन्न होणार आहे तेव्हा या कार्यक्रमासाठी कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच व जेष्ठ महिला समिती यांनी केले आहे.