सातभाई ट्रेनिंग सेंटरने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत केले गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक
हॉटेल मॅनेजमेंट ८३.३३% तर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर ८८.४६ टक्के निकाल

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर मध्ये महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळातर्फे जून २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी या विभागाचा ८३.३३% तर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या विभागात ८८.४६ टक्के निकाल लागला असल्याची माहिती संस्थेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की हॉटेल मॅनेजमेंट विभागात प्रथम क्रमांक मृणालिनी परशराम साबळे (६२.८३%) द्वितीय क्रमांक रेखा जॉन दिवे (६७.१७%) तृतीय क्रमांक निखील सखाराम मुट्ठे (६६.८३%) तर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर विभागात प्रथम क्रमांक मोनाली बाळासाहेब गवळी (७४%) विशाल हणमंतराव उबाळे (७४%) द्वितीय क्रमांक सोनाली ज्ञानेश्वर पवार (७३.१७%) तर तृतीय क्रमांक संदीप डेविड पलघडमल (७२.८३%) यांनी मिळवला आहे.तर विनायक राजेंद्र शिवाळ (६८.१७%) मनीषा बाळासाहेब गायकवाड (६९.५०%)समीर विजय नाईक (६८%) प्रमोद रंगनाथ (७०.१७%) तुषार बाबासाहेब जगताप (७१.१७%) कृष्णा नंदू बोरगुडे (६६.३३%) सिद्धार्थ सखाहरी मेहेरखांब (७९.६७%) योगेश उत्तमराव माने (६८.८३%) सुनील बाळासाहेब ठोंबरे (६९.८३%) प्रसन्न दिपक भाटे (६७.५०%) अमोल प्रकाश गायकवाड (६७.८३%) प्रवीण बाळासाहेब झांबरे (७२%) आंद्रेश सुनील राठोड (६७.३३%) किरण भाऊराव भागवत (६९.१७%) आदिती भैरोप्रसाद केशरवाणी (७१%) संकेत सुदाम मगर (६८.८३%) आदित्य आप्पासाहेब मुंडे (६४.३३) कीर्ती ज्ञानेश्वर गव्हाळे (६७.८३%) शिवम अशोक नागरे (६८.६७%) कुणाल भगवान शिंगाडे (६०%) सलीम सरदार शेख (६२.५०%) आदि विद्यार्थी यशस्वी झाले असून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे, सचिव सुचित्रा साबळे, रजिस्टार बापुसाहेब डांगे,प्रा विजय कापसे,प्रा विशाल धारणगावकर,प्रा विजय जाधव, प्रा जनार्दन सुपेकर, निलेश देवकर आदि शिक्षकांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.