विवेकभैय्या कोल्हे चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे कोपरगावमद्ये आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहर आणि परिसरातील बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सलग तिसऱ्या वर्षी संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ३१ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी विवेकभैय्या कोल्हे चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी देशातील विविध राज्यातून स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.भक्तनिवास क्रमांक दोन, संत जनार्दन स्वामी आश्रम, पुणतांबा फाटा, कोपरगाव येथे ही स्पर्धा होणार आहे. ११,१४, १९ वर्षांखालील गट आणि खुला गट अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ११.०० वाजता युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी चारही गटांत एकूण ६५ रोख बक्षिसे आणि १३० चषक स्वरुपात ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी महिला व मुलींना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रत्येक गटात स्वतंत्र बक्षिसे व चषक ठेवण्यात आले आहेत. ही सर्व बक्षिसे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा स्विसलिग पद्धतीने होणार असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या या स्पर्धेसाठी शांता मेडिकल, गांधी चौक, कोपरगाव व यशश्री बँगल्स कोर्ट रोड,कोपरगाव या ठिकाणी नाव नोंदणी चालू आहे. तसेच बाहेरील स्पर्धकांसाठी https://forms.gle/Gq4x41PjjrEfkND38 या ऑनलाइन लिंक वर करता येईल. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी संकेत गाडे मो. ७८७५६७३२३३ किंवा नितीन सोळके मो. ९८९०४८९०३३ यांच्याशी संपर्क साधावा, तसेच स्पर्धकांनी येताना आपल्या सोबत चेस बोर्ड आणावेत असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.स्पर्धेचे मुख्य पंच (ऑर्बीटर) म्हणून गुरुजीत सिंग व सागर गांधी हे काम करणार आहे.विवेकभैय्या कोल्हे यांची नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन आणि सहकार्य करण्याची कार्यपद्धती आहे.आपल्या ग्रामीण भागातून दर्जेदार खेळाडू घडले पाहिजे यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या ठरणार आहेत.भारतातील विविध राज्यातून या स्पर्धेसाठी येणारे स्पर्धकांच्या माध्यमातून कोपरगावचे नावलौकिक वाढण्यास मदत होणार आहे त्यासाठी सर्वच खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे प्रतिपादन विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लबचे सदस्य प्रमोद वाणी, महेश थोरात,यश बंब, नितीन जोरी, राजेंद्र कोळपकर, साक्षी गाडे, लक्ष्मण सताळे, प्रशांत चव्हाण, सुमित गुप्ता, जसविंदर सिंग, संदीप कवडे, वैभव सोमासे, राजीव बोधक, नितेश बंब, गणेश कोळपकर, निखिल धोंगडी, नपुर संचेती, अथर्व थोरात, तन्मय महाजन, विशाल पंडोरे आदी प्रयत्नशील आहे.