स्व.माधवराव कचेश्वर पा. आढाव यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व कमानीचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष स्वर्गीय माधवरावजी (आप्पा) कचेश्वर पाटील आढाव यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने धांरणगाव रोड लगत असलेल्या नवीन नगर परिषदेच्या कार्यालया जवळील माधव बागेच्या जागेवर स्वर्गीय माधवरावजी पाटील आढाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व लक्ष्मीनगर येथील भव्य कमानीचे उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक १९ जुलै रोजी सायंकाळी ०४ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी जलसंपदा मंत्री तसेच गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते पार पडणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोकराव काळे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष दादा काळे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे सर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे पाटील तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे आदी यावेळी उपस्थित राहणार आहे

सदरचा कार्यक्रम हा कृष्णाई बँक्वेट हॉल छत्रपती संभाजी महाराज सर्कल कोपरगाव या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले असून सदरचा कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे अशी माहिती नगरसेवक विजयराव आढाव गणेश आढाव,संजय आढाव,
माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, विजय रावसाहेब आढाव,जितेंद्र रनशूर बाळासाहेब आढाव सुनील फंड राजेंद्र कोयटे, संतोष गंगवाल,विकास आढाव, अमित आढाव, श्री आढाव अजय आढाव, विकी जोशी, अमोल आढाव,मंदार आढाव, परेश आढाव,
संतोष चव्हाडके, रवींद्र आढाव,बाळासाहेब आढाव, वृषीकेश सांगळे राष्ट्रपती पुरस्कार विजेते बापूसाहेब सुराळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे आभार गणेश आढाव यांनी मानले.