Breaking
डॉ.सी.एम मेहता कन्या विद्यालय

कै. शिवाजीराव आनंदराव संधान यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालेय साहित्य वाटप

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कै. शिवाजीराव आनंदराव संधान यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.सी.एम. मेहता कन्या विद्या मंदिर येथील विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थांच्या कार्याचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.या वेळी कै.दगडू महाराज उपाध्ये यांच्याही स्मरणार्थ देखील साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमामध्ये अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी उपस्थित राहून आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

जाहिरात

आपणही रयतचे विद्यार्थी असल्याने कमवा आणि शिका सारख्या योजना जडणघडण होण्यासाठी मोलाच्या ठरल्या.स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या प्रमाणे विद्यार्थिनींच्या आयुष्यात बदल घडण्यासाठी यथाशक्ती मदत करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी ज्येष्ठ नागरिक मंचाच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे, जेष्ठ नागरिक मंचचे विजय बंब, उत्तमभाई शाह, श्वेताताई कोठारी, मधुबालाताई उपाध्ये, कमलाताई उपाध्ये, डॉ. विलास आचारी, ज्येष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी, सोनमताई कोठारी, पुष्पाताई कोठारी यांची उपस्थिती लाभली.या प्रसंगी डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्या मंदिर येथील प्राचार्या धनक मॅडम, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यार्थिनींनी शालेय साहित्य मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि आयोजकांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. समाजासाठी कार्यरत असलेल्या संस्था आणि व्यक्ती या माध्यमातून शिक्षणास हातभार लावत असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »