डॉ.सी.एम मेहता कन्या विद्यालय

डॉ सी एम मेहता कन्या विद्यालयात पालक सभा संपन्न

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ सी एम मेहता कन्या विद्यालयात पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या अगोदर विद्यालयाच्या प्राचार्या प्रमोदिनी शेलार,
उपमुख्याध्यापक रावसाहेब शिंदे ,पर्यवेक्षक सुरेश सोनवणे ,मेहबूब शेख ,पालक संघाचे उपाध्यक्ष व कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष युसुफ रंगरेज,पत्रकार संघाचे सहसचिव बिपिन गायकवाड,गिरीश शेवाळे,बाबुराव पवार,कोमल उदावंत,आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.सभेच्या सुरुवातीला शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षपदी युसुफ रंगरेज व माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी कोमल उदावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना विद्यालयाचे उपशिक्षक किरण चांदगुडे यांनी शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्याचे उद्देश स्पष्ट करतांना विद्यार्थिनींचा शैक्षणिक,गुणात्मक व संख्यात्मक विकास होण्यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात येते असे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या प्रास्तविकां मधून (दहावी) एस.एस.सी चा निकाल तसेच भौतिक सुविधा याविषयी सखोल मार्गदर्शन केले यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून साळगट व कोमल उदावंत यांनी देखील आपले मत व्यक्त केले व विद्यालयामध्ये राबविले जाणारे विविध उपक्रम व विद्यालयाचा गुणात्मक विकास याविषयी समाधान व्यक्त केले.विद्यालयाच्या प्राचार्या प्रमोदिनी शेलार यांनी आपले मत व्यक्त करताना विद्यार्थिनींचा बौद्धिक विकास व गुणात्मक दर्जा उंचविण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन तसेच विकसनशील विद्यार्थी उपक्रम गुरुकुल प्रकल्प इत्यादी विषयी माहिती दिली त्याचबरोबर विद्यार्थिनींचा शारीरिक विकास व गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी विद्यालयात विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या जातात असे याप्रसंगी सांगितले तसेच किशोरवयीन मुलींच्या समस्या निवारण्यासाठी विद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते. विद्यार्थिनींना स्वावलंबनाचे धडे त्याचबरोबर आत्मनिर्भरता हे गुण विकसित करण्यासाठी बाह्यतज्ञ मार्गदर्शन करिअर गायडन्स देखील केले जाते असे शाळेच्या प्राचार्या प्रमोदिनी शेलार यांनी सांगितले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण चांदगुडे व आभार अरुण बोरनरे यांनी मानले सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे उपशिक्षिक बाबुराव साबळे, उपशिक्षिका कल्पना सोनवणे ,माधुरी हरिदास यांनी प्रयत्न केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे