डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव येथील डॉ सी एम मेहता कन्या विद्यालयात नुकतेच कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच व डॉ सी एम मेहता कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्य वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयाच्या प्राचार्या सौ प्रमोदिनी शेलार उपमुख्याध्यापक रावसाहेब शिंदे,पर्यवेक्षक सुरेश सोनवणे,मेहबूब शेख,ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सौ सुधाभाभी ठोळे, मंचचे उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले,कार्याध्यक्ष विजयजी बंब,मंचचे देणगीदार रेणुकाताई नाईक, सत्यमजी मुंदडा,डॉ चिंतन कोठारी, किरणताई कोठारी, तिवारी मामा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाच्या गरीब विद्यार्थीनी फंडचे विभाग प्रमुख अरुण बोरनारे यांनी मान्यवरांचा परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यानंतर विद्यालयातील गरीब,हुशार व होतकरू विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्यात आले
यावेळी सत्यमजी मुंदडा यांनी विद्यार्थिनींना गुरुपौर्णिमे विषयी माहिती देताना त्यांच्या जीवनात गुरुचे स्थान मोठे आहे असे सांगून गुरूंचा मान सन्मान करा असे सांगितले तर किरणताई कोठारी यांनी गुरु हे दिपस्तंभा सारखे असून, गुरुविना ज्ञान नाही व ज्ञानाशिवाय सन्मान नाही त्यामुळे गुरूंचा सन्मान करा असे सांगितले.जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे यांनी गुरु व शिष्य यांचे मधील अतूट नात्याचे महत्व आपल्या गीतामधून पटवून दिले. विद्यालयाच्या प्राचार्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमोदिनी शेलार यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व अगदी सोप्या भाषेत विद्यार्थिनींना समजावून सांगितले तसेच विद्यार्थिनींच्या गुणवत्ता वाढीसाठी विद्यालयामध्ये राबविले जाणारे विविध उपक्रमा विषयी उपस्थित मान्यवरांना माहिती देऊन ज्येष्ठ नागरिक सेवा मंच यांचे विद्यालयास सतत मार्गदर्शन व सहकार्य होत असते असे प्राचार्य प्रमोदिनी शेलार याप्रसंगी सांगितले.सदरचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाचे आभार प्रवीण निळकंठ यांनी मानले.