एस.एस.जी.एम.कॉलेज

एस.एस.जी.एम महाविद्यालयात ई-परिषदेचे आयोजन

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील Commerce & Management, Economics, B.B.A.आणि IQAC विभागाच्या संयुक्त विद्यमाने “Recent Trends in Commerce, Economics & Management” (RTCEM- 2025)” या विषयावर मंगळवार, दि.१८ मार्च २०२५ रोजी आभासी प्रणालीद्वारे राष्ट्रीय ई- परिषदेचे आयोजन केलेले आहे. सदर ई-परिषदेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रो. (डॉ.) पराग काळकर यांच्या शुभहस्ते होणार असून अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. अॅड. भगीरथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदर ई-परिषदेसाठी सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसा, गोवा येथील वाणिज्य शाखेचे प्राध्यापक (डॉ.) फिलिप रॉड्रिग्ज ई. मेलो, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर्स टेक्नोलॉजी, रिसर्च अँड मॅनेजमेंट, स्वायत्त विद्यापीठ, अहमदाबाद, गुजरात येथील विभागप्रमुख डॉ. प्रवीण जाधव, गौहाटी कॉमर्स कॉलेज गुवाहाटी विद्यापीठ, आसाम येथील अकाउंटंसी विभाग प्रमुख डॉ.गौर गोपाल बनिक आणि वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे, जी.एस.एम.कॉलेज पुणे येथील प्राचार्य डॉ.प्रमोद बोत्रे हे मार्गदर्शन करणार आहे. तरुण संशोधकांना वाव मिळावा म्हणून ई-परिषदेमध्ये संशोधन पेपर सादरीकरण ठेवलेले आहे. या राष्ट्रीय ई-परिषदेसाठी संशोधकांकडून संशोधन लेख मागविण्यात आले आहे. सदर संशोधन पेपर International Journal of Economics, Business, Accounting, Agricultural and Management Towards Paradigm Shift in Research, ISSN-3065-9140 मध्ये प्रकाशित होणार आहे.
संशोधनाचे विषय खालील प्रमाणे आहेत.E- Commerce, Recent Trends in Economics, E-Waste Management, E- Trade, Modern Management Practices, National Education Policy, Recent Trends in Commerce, Industrial Sector Human Resources, Recent Trends in Management, International Trade, Business Administration, Recent Trends in Banking, Financial Market,Agriculture Sector, Recent Trends in Marketing, Business Startups, Green Marketing,Accounting Practices, Service Sector, Indian Knowledge System, Entrepreneurship, Digital Marketing, Artificial Intelligence in Commerce.
खालील लिंकच्या सहाय्याने परिषदेत आपला सहभाग नोंदवावा.सहभाग नोंदविण्याची अंतिम दिनांक १७ मार्च २०२५ ही आहे. नोंदणीसाठी लिंक – https://forms.gle/Rt1sJcJ247HrnjfR9पेपर पाठविण्यासाठी मेल आय डी- ssgmconference2025@gmail.comतरी जास्तीत जास्त विषयतज्ञ व अभ्यासकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे यांनी केले आहे. सदर परिषदेचे संयोजक डॉ.अर्जुन भागवत, डॉ. बंडेराव तऱ्हाळ, डॉ.सीमा चव्हाण, प्रा.दिलीप भोये हे आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे