आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे -सौ.चैतालीताई काळे

0 5 4 0 0 7

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

शाळेतील विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे त्यांच्या अभ्यासातील यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु हे केवळ विद्यार्थ्यांपर्यंतच मर्यादित न राहता, पालकांनी देखील आपल्या मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेवून विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी देखील स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सौ.चैतालीताई काळे यांनी सांगितले.प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत पी.एम.श्री जिल्हा परिषद शाळा शिंगवे व श्री साईबाबा संस्थान रुग्णालय शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा शिंगवे येथे आयोजित मोफत सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबीराचे व खगोलशास्त्रीय प्रयोगशाळेचे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब जाधव होते.त्या पुढे म्हणाल्या की, शाळेतून परतल्यावर विद्यार्थी प्रामुख्याने मानसिक थकवा आणि शारीरिक कमजोरी अनुभवतात. पालकांनी विद्यार्थ्यांच्या आहार आणि विश्रांतीचे व्यवस्थापन योग्य रीतीने करणे आवश्यक असून विद्यार्थ्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. अत्याधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ स्क्रीनवर जास्त जातो. या स्क्रीन टाइममुळे विद्यार्थ्यांचे डोळे आणि शारीरिक आरोग्य प्रभावित होऊ शकते. पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाइमवर लक्ष ठेवणे आणि त्यांना मैदानावर खेळायला किंवा विविध शारीरिक स्पर्धेमध्ये भाग घ्यायला प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
जाहिरात

जगाच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सर्वच पातळीवर टिकला पाहिजे यासाठी शासनाचा उद्देश सत्यात उतरविण्यासाठी शिक्षकांनी देखील प्रमाणिक प्रयत्न करावे असे सांगत खगोलशास्त्रीय प्रयोगशाळेच्या निर्मितीबद्दल शिक्षकांचे व शाळा व्यवस्थापन समितीचे सौ.चैतालीताई काळे यांनी यावेळी कौतुक केले. गोदावरी इक्विपमेंट प्रा.लि.चे भाऊसाहेब काळवाघे व गोदावरी बायो रिफायनरीचे कार्यकारी संचालक सुहास गोडगे यांनी शाळेसाठी भरीव मदत केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.याप्रसंगी श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे हदयरोग तज्ञ डॉ. संदीप देवरे, ऑर्थो सर्जन डॉ. संजय खुराणा, न्युरो सर्जन डॉ. मुकुंद चौधरी, जनरल सर्जन डॉ.अजिंक्य पानगव्हाणे, बालरोग तज्ञ डॉ. अनंत भांगे, फिजिशिअन डॉ.अजिंक्य ढाकणे, नेत्ररोग तज्ञ डॉ.अजित पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ.पुजा सिंग, डॉ.शीतल सोनवणे आदींसह आरोग्य विभाग कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र सावळीविहीर व उपकेंद्र शिंगवे येथील सर्व कर्मचारी, मुख्याध्यापक भागवत करपे, भाऊसाहेब जाधव, जनार्दन बर्गे, बाळासाहेब बाभूळके, विजय गडाख, विनायक बर्गे, राजेंद्र काळे, माजी सरपंच ज्ञानदेव चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, उपाध्यक्ष राहुल बर्गे, महेश काळवाघे, मच्छिंद्र सुराळकर, सचिन कहार, संजय ठोंबरे, वैशाली मोरे, शरयू सुराळकर, सोनाली चौधरी, वैशाली पगारे, रेश्मा शेख, बबनराव पगारे, संदीप चौधरी, युवराज माळी, प्रशांत पगारे, कल्पना ठोंबरे, संदीप काळवाघे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब कटारनवरे, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे