अहिल्यानगर उत्तर विभागाच्या भारतीय बौध्द महासभेच्या वतीने शिर्डी प्रांताधिकारी यांना दिले निवेदन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी बुधवार दिनांक १२ मार्च २०२५ रोजी सकाळी १२.०० वाजता शिर्डी येथे प्रांताधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून मनोज भोसेकर यांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने निवेदन देण्यात आले सदर निवेदनात म्हटले आहे की बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी बुद्धगया येथे सुरू असलेल्या बौध्द भिक्षूंच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शिर्डी येथे अहिल्यानगर उत्तर विभागाच्या भारतीय बौध्द महासभेच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात पुढे म्हटले आहे की महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्धांना जेथे ज्ञान प्राप्ती झाली ते बुध्दगया येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील बौध्दांचे सर्वोच्च पवित्र श्रध्दास्थान आहे हे बौध्दांचे श्रद्धास्थान बौध्दांच्या ताब्यात असले पाहिजे तसेच महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौध्दांच्या ताब्यात देणे हा नैसर्गिक न्याय ठरेल त्यामुळे १९४९ चा महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा दुरुस्त करून महाबोधी महाविहार व्यवस्थापन समितीत सर्व सदस्य बौध्द असावेत असा कायदा करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौध्द महासभेच्या अहिल्यानगर उत्तर विभागाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच या आंदोलनास विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी देखील जाहीर पाठिंबा दिला आहे याप्रसंगी महाबोधी महाविहार मुक्त करा…, मुक्त करा…, महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे, बौध्दगया १९४९ हा कायदा रद्द झालाच पाहिजे, बौध्दगया अन्य समाजाच्या ताब्यातून मुक्त झालेच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता यावेळी दिलेल्या निवेदनावर भारतीय बौद्ध महासभेचे उत्तर जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर, उपाध्यक्ष गौतम पगारे, हिशोब तपासणीस विजय जगताप, जिल्हा संघटक व कोपरगाव प्रभारी बिपिन गायकवाड, विनायक वाघमारे,शिवाजी जमधडे, नारायण वीर, सुशांत पवार,नारायण सातपुते(नाना) बी.डी साबळे,अशोक उगले, ॲड.अनिल शेजवळ,ॲड.अविनाश शेजवळ नयना ताई शिरसाट, सुरेखा ताई गुंजाळ, मोकळ ताई, सुमनताई बनसोडे, मुकुंद थोरात, बापू बनसोडे, बजरंग चव्हाण, संजय गायकवाड, जय भीम निकम, जिल्हा संघटक व संगमनेर प्रभारी विश्वास जमधडे, बाळासाहेब खाजेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौध्दाचार्य शिवाजी जमधडे यांनी केले तर आभार विजय जगताप यांनी मानले.