भारतीय बौद्ध महासभेच्या अहिल्यानगर उत्तर विभागाच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
बिहार राज्यातील बौध्द गया येथील महाबोधी महाविहारात हिंदू महंतांनी केलेल्या अतिक्रमण मुक्तीसाठी शुक्रवार दिनांक 7 मार्च 2025 रोजी सकाळी 12 वाजता लुंबिनी बुध्द विहारा पासून मोर्चाला सुरुवात झाली यावेळी दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौध्द महासभा तसेच श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील आंबेडकरी विचारांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हातात निळे झेंडे घेत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे, १९४९ चा कायदा रद्द करावा, बौद्धगया विहारातील इतर धर्मियांचे अतिक्रमणे त्वरित हटवले पाहिजे अशा घोषणा देत सदरचा मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचला त्यानंतर त्या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले याप्रसंगी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सध्या बुध्दगया येथे सुरू असलेल्या आंदोलना बाबत आपल्या भावना व्यक्त केल्या
त्यानंतर श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ व उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील यांना भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले यावेळी तहसीलदार म्हणाले की आपण दिलेले निवेदन आम्ही शासनाकडे पाठवू व त्यावर शासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल असे यावेळी तहसीलदारांनी उपस्थित मोर्चेकऱ्यांना सांगितले सदरचा हा मोर्चा अगदी शांततेत पार पडला मोर्चात सहभागी झालेल्या भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा पदाधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी शिस्तबध्द पद्धतीने घोषणा दिल्या याप्रसंगी श्रीरामपूर शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.सदर निवेदनावर दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे अहिल्यानगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर,जिल्हा उपाध्यक्ष गौतम पगारे,संघटक बिपिन गायकवाड,कायदेशीर सल्लागार ॲड.अण्णासाहेब मोहन, माजी जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे, ज्ञानदेव रणदिवे प्रकाश सावंत दादासाहेब साबळे निवृत्ती पगारे अशोक बोरुडे भाऊसाहेब हिवराळे सुशीला सातदिवे संजय महाले सारिका मोहन शकुंतला जाधव वैशाली अहिरे विलास गवळी दिनकर मोरे संतोष बनसोडे रमेश दिवे राहुल दिवे सुधाकर सूर्यवंशी भाऊसाहेब बसावे दशरथ भोंगळे अंतर भरपूर आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.