अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भारतीय पोलीस सेवेत पदोन्नती

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची नुकतीच भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली असून त्यांच्यासह महाराष्ट्रातील ९ आयपीएस अधिकाऱ्याचां त्यामध्ये समावेश आहे याबाबत गृह विभागाने तसे आदेश काढले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला हे 2012 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून शासनाच्या नियमा प्रमाणे १३ वर्ष सलग सेवा बजावणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती देण्यात येते त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या अगोदर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे

तसेच त्या अगोदर नागपूर शहर पोलीस उपायुक्त, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे ही १३ वर्ष सलग सेवा झाल्याने त्यांची राज्य सरकारच्या गृह विभागाने त्यांची भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती झाल्याने त्यांच्या या निवडीबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेकांनी त्यांच्या वर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे.