मंगेश पाटील

कॅनलला पाणी आल्याने नगरपरिषदेने कोपरगाव शहराचा पाणीपुरवठा ४ दिवसाआड पूर्ववत करावा- मंगेश पाटील

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

एकीकडे कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पुर आल्याचे दिसत आहे व दुसरीकडे मात्र ऑगस्ट महिना जवळ आला तरी कोपरगाव शहराला पिण्यासाठी १२ दिवसा आड पाणी मिळत आहे तसेच धरण भागात पाऊस झाल्याने गोदावरी नदीला व नांदूर मधमेश्वर मधून कॅनलला पाणी सोडले आहे.
त्यामुळे नगरपालिकेने ४ दिवसाआड म्हणजे ५ व्या दिवशी पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा जेणे करून महिला भगिनींना नागरिकांना झालेल्या पाण्याच्या त्रास थांबेल. गेल्या तीन महिन्यापासून साधारण नागरिकांना गडूळ दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी येत होते.त्यामुळे नगरपरिषदेने शहरात असणारे फिल्टरेशन प्लांट/ पाणी शुद्धीकरण केंद्र यावर लक्ष ठेवून पाणी स्वच्छ करून नागरिकांना पुरवावे. जेणेकरून पावसाळ्यात पाण्यामुळे होणारे आजार हे होणार नाही याची काळजी ही नगरपरिषद प्रशासनाने घ्यावी.नगरपरिषदेला पाणी दिवस अचानक पणे वाढवायची वेळ येऊ नये यासाठी लक्ष ठेवून सातत्याने चार दिवसा आड कसा पाणीपुरवठा कायमस्वरूपी कसा करता येईल याची काळजी घ्यावी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे