नगरपरिषदेने अमरधाम मध्ये अंत्यविधी झाल्यानंतर मृत्यू नोंद बाबत केलेल्या बदलाची जागृती करावी- मंगेश पाटील

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरामध्ये अंत्यविधी होत असलेल्या अमरधाम,कब्रस्तान,ख्रिश्चन स्मशानभूमी या ठिकाणी मृत्यू नोंद बाबतचे डेथ सर्टिफिकेट मिळणे करिता माहितीपत्र फ्लेक्स बोर्ड तात्काळ लावावे.नगरपालिका स्थापने पासून अनेक वर्षांपासून अंत्यविधी झाल्यानंतर अमरधाम येथे नगरपालिकेने नोंद रजिस्टर वही ठेवली होती.त्यात अंत्यविधी झाल्यानंतर मृत व्यक्तीचे नाव-वय-पत्ता व नोंदवणाऱ्या ची माहिती याची नोंद मृत झालेल्या व्यक्तीच्या घरातील नागरिक करत होते व ही नोंद नगरपालिकेच्या रोजच्या रोज दप्तरी नोंद घेत होते. मात्र अलीकडच्या वर्षात अमरधाम मधील स्मशान जोगी एक पावती द्यायचा, त्यानुसार नगरपालिकेमध्ये नागरिक नंतर जाऊन नोंद करायचे.परंतु १ जुलै पासून अचानकपणे ही जुनी पद्धत बंद केल्याने नागरिकांमध्ये घरची व्यक्ती मृत्यू झाली असतांना दुःखात असतांना नोंद बाबतची संभ्रमता निर्माण झाली आहे त्यामुळे शहरामध्ये मोठे फ्लेक्स वेगवेगळ्या समाज्याच्या असणाऱ्या अंत्यविधीच्या ठिकाणी नगरपालिकेने लावने गरजेचे आहे तसेच नागरिकांना कळे पर्यंत एक पूर्ण वेळ माणूस ठेवून त्याचाही मोबाईलनंबर नागरिकांपर्यंत या ठिकाणची माहिती देण्यासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते. मात्र निश्चितपणे शासनाच्या नियमाप्रमाणे काही बदल नगरपालिका करत असेल तर त्याचे स्वागत आहे व ती केलेच पाहिजे. परंतु अचानक पणे असे करणे त्या दुःखीत कुटुंबावर संभ्रमावस्था निर्माण होते. असे कळते की अंत्यविधी करण्याच्या वेळेस नगरपालिकेच्या माणसाला कळवले पाहिजे व २१ दिवसाच्या आत मृत व्यक्तीची नोंद ही केली गेली पाहिजे.तसेच पन्नास वयाच्या आतील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शासकीय रुग्णालयातून मृत्यूचे कारण पोस्टमार्टम करून अंत्यविधीच्या आधी त्याबाबतचा दाखला घेणे गरजेचे आहे. तसेच नैसर्गिक रित्यामृत झालेल्या वयोवृद्ध किंवा व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला याचे मृत्युपत्र हे संबंधित फॅमिली डॉक्टरांकडून आधी घेतले पाहिजे.तरी नगरपालिकेने याबाबत नागरिकांमध्ये माहिती पोहोचवून तसेच अनाउन्समेंट करून किंवा फ्लेक्स बोर्ड लावून मृत्यू दाखला सोयीस्करित्या चक्रा न मारता नागरिकांना कसा मिळेल व त्या दुखीत कुटुंबाला कसे सहजरित्या दाखला देऊन सांत्वन रुपी सहकार्य नगरपालिकेकडून व्हावे हीच अपेक्षा.तसेच नगरपालिकेने स्मशानभूमी मध्ये काम करणाऱ्या तिथे राहणाऱ्या व्यक्तीला अथवा महिलेला योग्य ती पगार वाढ ही दिली पाहिजे व आरोग्याचा ठेका दिलेल्या ठेकेदारा कडून रोज शहरातील वेगवेगळ्या समाजाच्या अंत्यविधीच्या ठिकाणी त्यांना त्यांच्या पद्धतीने हवे तशी स्वच्छता करून द्यावी. कोपरगावची लोकसंख्या आजूबाजूचे शहरालगतचे भाग शहराला नव्याने जोडले गेले असल्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा विचार लक्षात घेता.कोरोना कालावधी पासून मृत्युदर ही वाढलेला आहेत. अंत्यविधी झाल्या नंतर रक्षा विसर्जनाच्या ठिकाणी दत्तपाराच्या खाली गोदावरी नदी काठी मैला मिश्रित घाण सांडपाणी त्याच ठिकाणी होते. तरी रक्षा विसर्जनासाठी दुसरी जागा अमरधामलगत नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी जेणेकरून मैलामिश्रित सांडपाण्यात रक्षा विसर्जन होणार नाही. दशक्रिया विधी ही मोठ्या प्रमाणात होत असल्याने महिलांसाठी व पुरुषांसाठीचे शौचालय तसेच कपडे बदलायची जागा रोजच्या रोज स्वच्छ ठेवले पाहिजे. तसेच नगरपालिकेतील अडचणीन बाबत तिथे सेवा देणारे न्हावी समाज, ब्राह्मण गुरु यांचा ही सल्ला घेतला पाहिजे.तसेच नगरपालिकेत गेल्या तीन वर्षापासून प्रशासक असल्यामुळे जनतेची होणारी अडचण लक्षात घेऊन व गैरसोयी बाबत ही मागणी करावी लागत आहे. डेथ सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचे असल्याने मृत व्यक्तीच्या नातलगांना सुईचे होण्यासाठी कोपरगाव येथील बाजार तळातील अमरधाम,बेट भागातील अमरधाम,कोर्ट जवळील जुने कब्रस्तान,१०५ मधील कब्रस्तान,टाकळी नाका येथील ख्रिश्चन स्मशानभूमी अशा या महत्त्वाच्या ठिकाणी मोठे फ्लेक्स माहिती पत्रक लावून जनतेला दिलासा द्यावा.