मंगेश पाटील

विद्यार्थ्यांनो न घाबरता समस्यांना तोंड देत यशस्वी व्हा- नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

भारत हा युवकांचा देश असून युवकांनी विद्यार्थी दशेत आपल्या मनात कोणतीही भीती न बाळगता येणाऱ्या समस्यांना सामोरे जात यशाची पावले टाकत आवडेल त्या क्षेत्रात करीयर करावे असे प्रतिपादन कोपरगावच्या निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी करंजी येथील कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने तालुक्यातील करंजी येथील कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयातील स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या ६ विद्यार्थ्यांचा व जिल्हा परिषद शाळेतील ४ विद्यार्थ्यांचा तसेच सहभागी झालेल्या ८५ विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देत केला या सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या या वेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन , माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, संघटनेचे तालुकध्यक्ष जनार्दन जगताप ,सरपंच रविंद्र आगवन, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष भिंगारे, डॉ विकास सोनवणे, डॉ सुनील देसाई, मुख्याध्यापक दिनकर माळी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी

१)डोखे हर्षल चांगदेव

२)ठाकरे हर्षदा दिपक

३)कटारे विरेन धनराज

४)निकम गायत्री पांडुरंग

५)कापसे प्रेरणा निलेश

६)तुलसी मच्छिंद्र भिंगारे

७)सिद्धी राहुल संवत्सरकर

८)वेदिका दादासाहेब कूहीले

९)अरमान अन्वर पठाण

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव विजय कापसे यांनी करत पत्रकार संघटनेच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली .माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या नीटनेटकेपणाचे, हुशारीचे, शालेय परिसर स्वच्छतेचे विशेष कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठया संख्येने स्कॉलरशिप परीक्षेत पात्र होणे ही भूषणावह बाब असल्याचे व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब यांनी देखील विद्यार्थ्याच्या हुशारीचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने राबवण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त केले.

या प्रसंगी संघटनेचे शहराध्यक्ष हाफिज शेख, उपशहरध्यक्ष स्वप्निल कोपरे, सिद्धार्थ मेहेरखांब, विनोद जवरे, काकासाहेब खर्डे, राजेंद्र तासकर,विजय कापसे आदी पत्रकारांसह शिक्षक वृंद ,कमिटी सदस्य तसेच निलेश कापसे, अनिल शिंदे, दादासाहेब कुहिले, गणेश फापाळे, गणेश भिंगारे, आशपाक मणियार,मच्छीन्द्र भिंगारे, योगेश आगवन, एकनाथ कापसे आदी शिक्षणप्रेमी नागरिकांसह ग्रामस्थ पालक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक ललित जगताप यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा करंजीचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच राज्य मराठी पत्रकार संघटनेचे कोपरगाव तालुका व शहर पदाधिकारी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे