महाराष्ट्र

सामाजिक जाणिवेतून अशोकराव शिंदे यांचा ६४ वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

0 5 3 8 0 8

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव भूमी ही राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य म्हणून सुपरिचित आहे येथे विविध जाती धर्माचे पंथाचे लोक गुण्या गोविंदाने येथे राहतात या कोपरगाव भूमितच आयु.अशोकराव विष्णुपंत शिंदे यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९६१ रोजी झाला वडिलांचा ट्रकचा व्यवसाय होता विविध संस्था व राजकीय पक्ष व धार्मिक संस्थेचे विविध पदावर काम करत असतांना सामाजिक बांधिलकी स्वीकारून समाजाचे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी रात्रंदिवस सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असून सामाजिक बांधिलकीतून समाजाला जोडण्याचे काम केले आहे अशोकराव शिंदे हे मनमिळाऊ व्यक्तिमत्व तसेच स्पष्टवक्तेपणा असून कोणतेही काम हे तत्परतेने करीत असतात पोलीस स्टेशनचे काम असो कोर्टाचे काम असो महसूल विभागातील तहसील कार्यालयातील विविध प्रकारचे कामे विना विलंब व सेवाभावी वृत्तीने अजता गायत करत आहे आहेत निस्वार्थी भावनेतून समाजसेवेचे व्रत अंगी करणारे अशोकराव विष्णुपंत शिंदे यांना सन २०१० मध्ये नाशिकच्या प्रगती महिला सामाजिक संघटनेच्या वतीने समाज रत्न पुरस्काराने सन्मानित केले आले आहे तसेच त्यांचा रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी अशोकराव शिंदे हे ६४ व्या वर्षात पदार्पण करत आहे त्यानिमित्ताने कोपरगाव येथील लुंबिनी उपवन बुद्ध विहार या ठिकाणी समस्त सकल आंबेडकर समाजाच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला यावेळी समाज बांधवांच्या हस्ते शाल हार व गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी दिपकराव गायकवाड रंभाजी रणशूर भीमराज गंगावणे शांताराम रणशूर जितेंद्र रणशूर दिनेश कांबळे प्रकाश दुशिंग अशोक शिंदे बाबासाहेब कोपरे शरद खरात रवींद्र साबळे बाळासाहेब रोकडे तुकाराम रणशूर प्रभाकर थोरात मारुती कोपरे गौतम गायकवाड नानाभाऊ रोकडे बिपिन गायकवाड खिवराज दुशींग विजय भातनकर नितीन बनसोडे मनोज शिंदे दत्तू घोडेराव रमेश हेगडमल वसंतराव गाडे अनिल पाईक नानासाहेब रणशूर रमेश मोरे सचिन शिंदे तसेच कोपरे फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे