महाराष्ट्र

जगातील उच्चभ्रू नागरिक महागडे ब्लॅक वॉटर पितात मात्र कोपरगाव मध्ये तेच वॉटर नळाद्वारे मोफत मिळते !!

0 5 4 0 1 8

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव नगरपरिषदे मध्ये सध्या प्रशासक राज सुरू आहे त्यामुळे नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी शहरातील नागरिकांच्या जीविताशी खेळताना दिसून येत आहे कोपरगाव नगरपरिषदेच्या मालकीची येसगाव येथे पाच तळे असून सुद्धा दरवर्षी उन्हाळ्यात कोपरगावकरांना दहा दिवस बारा दिवस तर कधी पंधरा दिवसांनी पिण्यासाठी पाणी नगरपरिषद देते मात्र वर्षाच्या वर्षाला नळपट्टी मात्र सक्तीने अगदी शास्ती लावून वसूल करते सध्या स्थितीत पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलावांचा पाण्याचा तळ उघडा पडला आहे तळाचे साठलेले पाणी उपसून कोपरगावकरांची तहान भागवण्याचे काम सध्या नगरपरिषद करत आहेत यंदा पिण्याच्या पाण्याचे टंचाईची दाहकता अधिक असून शहरावर पाणी बाणीची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे सध्या तलावातील उरलेसुरले पाणी शुद्ध करून किंवा तसेच कोपरगावकरांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तसेच नगर परिषदेने कालव्यातून मिळणारे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन मिळण्यासाठी काही नियोजन केले आहे का

जाहिरात
जाहिरात

याबाबत पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सांगायला तयार नाहीत तेव्हा कोपरगावकरांनो थोडं अजून थांबा डोके चालवां व नंतर हे कोडे सोडवा बघा तुम्हाला हे पाण्याचे कोडे सोडवायला जमतयं का ! सध्या शहराला १० दिवसाआड ब्लॅक वॉटर नळाद्वारे लोकांना घरपोच मिळत आहे ते पाणी तपकिरी रंगाची असून पाणी भरल्यावर १० ही दिवस त्याचा रंग बदलत नाही तेव्हा जगामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड होण्यासाठी “कोण म्हणतं पाण्याला रंग नाही” जो म्हणत असेल त्याला कोपरगाव मध्ये बोलावून नळाला येणारे ते पाणी दाखवा तेच पाणी स्थानिक नागरिक कुठेही बोभाटा न करता अगदी निमुटपणे ते पाणी ११ दिवस पितात व वरून नगरपरिषद म्हणते कृपया नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने व जपून करावा अशी नगरपरिषद महाराष्ट्रात पहिलीच असेल व त्या गावातील नागरिक देखील खूप संयमी असतील की इतके ब्लॅक वॉटर येऊन सुद्धा तोंडातून ब्र शब्द देखील काढत नाहीत किंवा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना जाऊन जाब देखील विचारत नाहीत त्यामुळे कोपरगावचे लोक फार संयमी आहेत हेच म्हणावे लागेल यापूर्वी कोपरगाव शहराची ओळख धुळगाव म्हणून होती आता ती कुठेतरी पुसत चालली तर आता पाण्यामुळे कोपरगावची ओळख ब्लॅक वॉटर मुळे परत लिंबका बुकात नोंद होण्यासारखी झाली आहे.

1/5 - (1 vote)

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे