कोपरगाव तालुक्यात यंदा भावी खासदार मतदारांपुढे कशी साखर पेरणी करणार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव शहरासह तालुक्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे यामध्ये महायुतीचे उमेदवार व महाविकास आघाडीचे उमेदवार हे मागील दोन दिवसापासून आपल्या कार्यकर्त्यांवर प्रचाराची जबाबदारी देऊन ते कार्यकर्ते सध्या शहरासह ग्रामीण भागात घरोघरी जाऊन प्रचाराचा अजेंडा पोहचवत आहे त्यासाठी दोन्हीही पक्षाचे कार्यकर्ते कंबर कसून उन्हा तान्हाची परवा न करता कामाला लागली आहे तसेच कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याने राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे ते महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांसह सक्रिय झाले आहेत तसेच भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे या बुधवार पर्यंत तरी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे तेव्हा आता बोटावर मोजने इतके दिवस शिल्लक असतांना कोल्हे परिवाराची नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कधी दूर करणार याकडे कोपरगाव शहरासह तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे तसेच इतर तालुक्यांमध्ये ज्याप्रमाणे रोज सभांचा धडाका सुरू आहे तसा अजून तरी कोपरगाव शहरासह तालुक्यात निवडणुकीचा धुराळा अजून तरी उडतांना दिसून येत नाही सध्या कोपरगाव तालुक्यात उन्हाची तीव्रता जास्त आहे त्यातच कोपरगाव शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा गंभीर होत चाललेला आहे आज शहराला दहा दिवसांनी पिण्यासाठी पाणी मिळत आहे तसेच शहरासह तालुक्यातील गोरगरीबांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे

मात्र एकाही उमेदवाराच्या अजिंठ्यावर कोपरगाव तालुक्याच्या विकासाचे नियोजन दिसून येत नाही त्यामुळे येणाऱ्या भावी खासदाराकडे मतदार राजा म्हणतो आहे की तुम्ही आमच्या कोपरगाव तालुक्यासाठी तुम्ही काय केले ? आणि मग तुम्ही भविष्यात कोपरगाव तालुक्याच्या विकासासाठी काय करणार आहात ? असे प्रश्न विचारतांना दिसून येत आहे मागील सरकारने फक्त भांडवलदारांची घरे भरली. आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कांद्याची निर्यात बंदी केली. मग तुम्ही म्हणा किंवा तुमच्या नेत्याने आम्हा शेतकऱ्यांसाठी काय केले आमच्या पोरांच्या शिक्षणाचे बारा वाजून टाकले आमची पोरं लय शिकलीत पण त्यांना नोकऱ्या मिळाणात फक्त निवडणुका आल्या की पाच वर्षांनी तुम्ही आमच्या दारात येतात पण आम्हाला तुम्हाला भेटण्यासाठी तुमचे कोपरगाव तालुक्यात संपर्क कार्यालय सुद्धा नाही मग तुम्हाला भेटायचे कुठे ? तुमचा साधा फोन नंबर सुद्धा कुणी देत नाही मग आम्ही निवडून देणाऱ्या खासदाराकडून आमच्या अडचणी सोडवायच्या कशा त्यामुळे या निवडणुकीचा आम्हाला काहीही फायदा नाही मग आम्ही का ? तुम्हाला मतदान करायचे यासह अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मतदार राजा सध्या ग्रामीण भागात आलेल्या उमेदवाराला व त्याच्या प्रतिनिधी कार्यकर्त्याला विचारत असून ह्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मोठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी दमछाक होतांना दिसून येत आहे.