महाराष्ट्र

कोपरगाव येथील नवचैतन्य हास्ययोग् परिवार आयोजित अवयवदान जनजागृती कार्यशाळा संपन्न

0 5 4 1 3 6

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव शहरातील राम मंदिराच्या पाठीमागे असलेल्या बजाज कोचिंग क्लास येथे नुकतेच अवयवदान जनजागृती कार्यशाळा पार पडली या कार्य शाळेला प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते व अवयवदान समुपदेशक डॉ.अशोक गावित्रे यांनी मार्गदर्शन केले डॉ.गावित्रे हे फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन व मोहन फाउंडेशन च्या माध्यमातून गेल्या १० वर्षापासून प्रबोधन व समाजामध्ये जनजागृती करत असुन त्यांच्याच प्रयत्नतुन शिर्डी येथील श्री साई बाबा संस्थान येथे लवकरच आय बँक सुरु होत आहे याप्रसंगी त्यांनी अवयवदानाची संपुर्ण प्रक्रिया त्यासाठी लागणारे फॉर्म कसे व कुठे भरावे अवयवदानाची देश राज्य,

जिल्हा पातळीवरील आकडेवारी तसेच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपण कसा कमी करू शकतो या संदर्भातील अंधश्रद्धा याबद्दल संपूर्ण माहिती दिली तसेच उपस्थिताच्या संपूर्ण शंकाचे निरसन केले तसेच मानवी देहाची माती किंवा राख होण्यापेक्षा त्याचा इतरांना उपयोग व्हावा म्हणून मृत्यू नंतर देखील आपणं जीवंत कस रहावं याबद्दल प्रबोधन केले तसेच या अवयवदानाच्या चळवळीत प्रत्येकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच NOTTO,ROTTO,SOTTO,ZTCC हे कसे काम करतात,प्रतीक्षा यादी कशी तयार केली जाते याबद्दल सविस्तर माहिती दिली याप्रसंगी सुप्रसिद्ध लेखक व निवेदक सुहासभाई मुळे हे देखील उपस्थित होते त्यांनी ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिये याविषयी सखोल माहिती दिली

याप्रसंगी गोदावरी खोरे तालुका दुध उत्पादक संघाचे चेअरमनराजेशआबा परजणे पाटिल यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यशाळेसाठी सी.आर बजाज व राहुल बजाज सर यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच या प्रसंगी नाईक सर, घाटे साहेब, योगेश जोबनपुत्रा देशपांडे, शिवकालजी भंडारी, अमृतकर सर, सुशीला बजाज आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते या अवयवदाना संदर्भात काही माहिती अथवा मदत् हवी असल्यास 7972677781 या दिलेल्या भ्रमणध्वनी वरती संपर्क साधावा असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले खऱ्या अर्थाने अवयवदान सर्वश्रेष्ठ दान आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे