Breaking
कोपरगाव

कोपरगाव नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

कोपरगावकरांना ३१ ऑगस्ट पर्यंत हरकती सह सूचना मांडण्याची संधी

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव नगर परिषदेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी आणि त्यावर हरकती व सूचना मागविण्यासाठी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी सोमवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी दुपारी प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना नगरपरिषदेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केल्या यामध्ये यंदा प्रभागाची संख्या १४ वरुन १५ वर पोहोचल्याने प्रभाग रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे इच्छुकांनसह राजकीय नेते मंडळींच्या देखील नजरा आता या प्रभाग रचने कडे लागून राहिल्या आहे कोपरगाव नगरपरिषदे कडे पूर्वी १४ प्रभाग व २८ नगरसेवक असे समीकरण होते मात्र यंदा १५ प्रभाग व ३० नगरसेवक झाल्यामुळे इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सन २०११ च्या जनगणने नुसार शहराची लोकसंख्या ६९,५३७ अशी आहे मात्र मतदार हे ६३,००० हजाराच्या आसपास आहे यामध्ये एस.सी मतदार १०,९३८ तर एस.टी मतदार १८१९ असे आहेत ही लोकसंख्या विचारात घेऊन प्रभाग व नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आली आहे त्यानुसार आता १५ प्रभागांमधून ३० नगरसेवक निवडून द्यायचे आहेत नगरपरिषद प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार केली आहे त्या रचनेनुसार १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत हरकती नोंदविता येणार आहे आलेल्या हरकती वर सुनावणी झाल्यानंतर आवश्यकतेनुसार बदल घडवून अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल नगरसेवकांची संख्या २ ने वाढल्याने नगरसेवक होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या मध्ये आनंदाचे वातावरण सध्या तरी निर्माण झाले आहे

जाहिरात

या प्रभाग रचनेमुळे अनेकांचे भवितव्य घडणार किंवा बिघडणार आहे त्यामुळे प्रभाग रचने नंतर राजकीय समीकरणांमध्ये अनेक उलथापाल होण्याची शक्यता आहे काहींना हक्काचे मतदार विभागले जाण्याची भीती आहे तर काहींना नव्याने सोयीचा प्रभाग निर्माण होण्याची एक अपेक्षा निर्माण झाली आहे या वर्षा अखेरी पर्यंत नगरपरिषदेच्या निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी आपआपल्या प्रभागांमध्ये तयारी सुरू केली आहे त्यातच यंदा नेहमीप्रमाणे काळे व कोल्हे गटाला उमेदवारी देतांना मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने शहरात सध्या राजकीय चर्चेला उधान आले आहे. त्यातच नगराध्यक्ष पद हे जनतेतून निवडून द्यायचे असल्याने इच्छुकांमधील स्पर्धा अधिकच तीव्र झाल्या आहेत अखेर प्रभाग रचने नंतर राजकीय निवड प्रक्रियेस अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »