मा.आ.स्नेहलता कोल्हे यांचा पाठपुरावा : पोहेगाव, जवळके कोपरगाव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जोडले

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. पोहेगाव खुर्द, पोहेगाव बुद्रुक आणि जवळके ही गावे आता औपचारिकपणे कोपरगाव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे नागरिकांचा मोठा दिलासा झाला असून, स्थानिकांच्या दीर्घकाळच्या त्रासाला पूर्णविराम मिळाला आहे.या मागणीचा ठोस पाठपुरावा केल्याने मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांना या भागातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.
स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मागणी मान्य झाल्याने जवळके आणि पोहेगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी आनंद व्यक्त करत कोल्हे यांचे आभार मानले आहे.
या आधी या गावांचा तालुका कोपरगाव असला तरी पोलिस ठाण्याच्या हद्दीनुसार ती शिर्डी पोलिस ठाण्याशी जोडलेली होती. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अगदी साध्या पोलिस कामासाठीही राहाता तालुक्यातील शिर्डी पोलिस ठाण्यात जावे लागत होते. एका कामासाठी दोन ठिकाणी चकरा माराव्या लागत असल्याने लोकांचा वेळ, पैसा व ऊर्जा खर्च होत होती. तसेच आधीच अपुऱ्या मनुष्यबळावर चालणाऱ्या पोलिस यंत्रणेवर अनावश्यक ताण निर्माण होत होता.नागरिकांच्या या व्यथा लक्षात घेऊन मा. आ. स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित विभागाशी चर्चा करून, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे हा मुद्दा ठोसपणे मांडला. गृह विभागानेही यावर त्वरेने कार्यवाही करत निर्णय जाहीर केला. यामुळे केवळ नागरिकांची गैरसोयच टळली नाही,

तर स्थानिक प्रशासनाला अधिक कार्यक्षमतेने वेगाने सेवा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे.हा निर्णय म्हणजे कोल्हे यांच्या अथक प्रयत्नांना मिळालेले यश असून, त्याबद्दल पोहेगाव खुर्द, पोहेगाव बुद्रुक आणि जवळके येथील ग्रामस्थांनी स्नेहलताताई कोल्हे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी घेतलेले हे पाऊल प्रशासन-नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारे ठरणार आहे.