द्वारकानगरी ते शंकरनगर रस्त्याचे काम सुरू न केल्यास साखळी उपोषणाचा इशारा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील द्वारकानगरी ते शंकरनगर येथिल रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या महिला,जेष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांना भेटून सदरचा भाग हा कोपरगाव शहराला जोडून घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती

त्या अनुषंगाने आमदार साहेबांनी आमचा संपूर्ण भाग कोपरगाव नगर परिषदेमध्ये नवीन हद्दवाढीमध्ये घेऊन सदर प्रभागाचा हद्दवाढ झालेल्या भागासाठी भरघोस निधी मिळूनही काही रस्त्यांची कामे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रखडली आहेत. नगरपरिषदेने १४ ऑगस्ट पर्यंत सदर रस्त्याचे काम सुरू न केल्यास स्थानिक नागरिकांच्या वतीने साखळी उपोषणाचा इशारा दिला असून याबाबत सदरचे निवेदन कोपरगावचे तहसिलदार,शहर पोलिस निरीक्षक, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी

तसेच आमदार आशुतोष काळे यांना देण्यात आले आहे. सदर निवेदनावर माधव पोटे,भाऊसाहेब गंगावणे, प्रकाश सूर्यवंशी बाळासाहेब तरवडे, रामचंद्र रामणी, भास्कर घनघाव, कुंडलिक शिरसाठ, निवृत्ती वाकचौरे, सुभाष क्षीरसागर, सचिन गवारे, संदिप कपिले आदीनी दिला आहे.