साई समर्थ प्रतिष्ठानची गणेशोत्सव कार्यकारिणी जाहीर

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील निवारा येथिल साई समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सर्व सभासदांच्या उपस्थितीत व साई समर्थ प्रतिष्ठानचे
संस्थापक अध्यक्ष कलविंदर सिंग डडीयाल व अनिरुद्ध काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सव दिमाखात, भक्तिभावाने व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा

एकमुखी निर्णय घेण्यात आला यंदा प्रतिष्ठान २७ व्या वर्षात पदार्पण करत असून.गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यात प्रतिष्ठानने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.तेव्हा यावर्षी देखील गणेशोत्सव आयोजनासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष गुरमीत सिंह डडीयाल कार्याध्यक्ष मंगेश लोखंडे उपाध्यक्ष प्रमोद बोथरा खजिनदार तुषार भगत,अथर्व कुलकर्णी सचिव कृष्णा गवारे,विक्रांत खर्डे,ढोल पथक व मिरवणूक प्रमुख साई गाडे,सोहम सातपुते संघटक राजेंद्र सावतडकर,किशोर कुलकर्णी,रुपेश वाकचौरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने शिस्तबद्ध मिरवणुक, सांस्कृतिक कार्यक्रम,स्वच्छता मोहिम, आणि सामाजिक उपक्रम यांचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच संघटन, समर्पण आणि संस्कार यांचा संगम साधत यंदाचा गणेशोत्सव अधिक गौरवशाली करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे.