कोपरगाव

नवक्रांती महिला उद्योजकता प्रशिक्षणार्थी महिलांना शॉप ॲक्ट लायन्सचे वाटप

0 5 4 1 8 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव शहरातील सम्राट फाउंडेशन संचलित नवक्रांती महिला उद्योजकता प्रशिक्षण अकॅडमी कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्या प्रशिक्षणार्थी महिलांनी संस्थेच्या नियमाप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी नवक्रांती महिला उद्योजकता प्रशिक्षण अकॅडमी यांच्या वतीने प्रशिक्षणार्थी महिलांना शॉप ॲक्ट लायसन्सचे वाटप टेक्नो पार्क स्किल इंडिया डेव्हलपमेंट या संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर विशाल सुरडकर तसेच नवक्रांती महिला उद्योजकता अकॅडमीच्या संचालिका राजश्री बागुल तसेच सम्राट फाउंडेशनचे संस्थापक चंद्रकांत बागुल, महिला शिवसेना जिल्हाप्रमुख विमल पुंडे,भारतीय बौध्द महासभेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर जिल्हा संघटक व कोपरगाव तालुक्याचे पालकमंत्री पत्रकार बिपिन गायकवाड, शिक्षिका ज्योती पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल व संस्थेच्या संचालिका राजश्री बागुल यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यानंतर स्किल इंडिया डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट मॅनेजर विशाल सुरडकर यांनी महिला उद्योजकता प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन शासनाने महिलांसाठी ज्या योजना राबविल्या आहेत त्या योजनांचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा तसेच ज्याप्रमाणे जग इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राकडे वळत असतांना महिलांनी देखील कुठेही मागे राहू नये यासाठी या संस्थेच्या वतीने महिलांना टेलरिंग, कॉम्प्युटर रिपेरिंग, नऊवारी साडी बनविणे अशा विविध व्यवसायाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख विमल पुंडे उपस्थित प्रशिक्षणार्थी महिलांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की राज्य शासनाने व केंद्र शासनाने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या असून त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या शासनाच्या वतीने व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या योजना तळागाळा पर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या सुरू आहे महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा रोजगार निर्मिती करून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सन्मानाने एक उद्योजकता महिला म्हणून आपण मार्केटमध्ये प्रवेश केला

जाहिरात
जाहिरात

पाहिजे शासनाने महिलांसाठी जे १५०० रुपयाचे मानधन ते २१०० रुपये मिळावे याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील आहेत तसेच महिलांसाठी रोजगाराच्या संधी देखील शिवसेनेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत तसेच सरकार देखील महिलांच्या कार्यकर्तृत्वासाठी व उद्योजकतासाठी नवनवीन योजना राबवून जास्तीत जास्त महिलांना उद्योजक क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या संधी हे शासन उपलब्ध करून देत आहे असे प्रतिपादन विमल पुंडे यांनी सांगितले त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की नवक्रांती महिला उद्योजकता अकॅडमीच्या वतीने महिलांच्या स्वालंबनासाठी व महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा उद्योग निर्माण करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा निर्माण करणे या यासाठी चंद्रकांत बागुल व त्यांच्या सुविद्य पत्नी राजश्री बागुल यांनी तळागाळातील सर्व समाजातील महिलांसाठी नवक्रांती महिला उद्योजकता या संस्थेच्या वतीने प्रशिक्षण देऊन त्या प्रशिक्षणार्थी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना कोपरगाव सारख्या शहरासह तालुक्यांमध्ये आणून महिलांना एक आधार देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे केले त्यामुळे आज या प्रशिक्षण केंद्रामधून प्रशिक्षण घेतलेल्या २०० महिलांना संस्थेच्या वतीने शॉप ॲक्ट लायसनचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

त्यानंतर पत्रकार बिपीन गायकवाड म्हणाले की सम्राट फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल यांनी केंद्र व राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या योजना आपल्या कोपरगाव शहरासह तालुक्यांमधील सर्व समाजातील महिलांना नवक्रांती महिला उद्योजकता प्रशिक्षण अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिला प्रशिक्षणार्थींना संस्थेच्या वतीने शॉप ॲक्ट लायसन देण्यात आले खऱ्या अर्थाने अगदी कमी कालावधीमध्ये लावलेलं छोटसं रोपट आज बघता बघता त्याचा मोठा वटवृक्ष तयार झाला आणि खऱ्या अर्थानं आज या संस्थेच्या माध्यमातून २०० महिलांना स्वतःचा टेलरिंगचा व्यवसाय उभा करण्यासाठी व त्या व्यवसायाला शासनाच्या नियमानुसार कुठलाही उद्योग व्यवसाय करण्यासाठी शॉप ॲक्ट लायसन ची गरज असते आणि ती गरज लक्षात घेता चंद्रकांत बागुल यांनी व त्यांच्या पत्नी राजश्री बागुल यांनी सर्व प्रशिक्षणार्थी महिलांना मोफत शॉप ॲक्ट लायसन्सचे प्रमाणपत्र उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सुनिता मुदबखे, कांचन भोकरे, माधुरी कदम व वैशाली मोगल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की संसाराचा गाडा ओढत असतांना आलेले अनेक अनुभव तसेच नातेवाईक व समाजाने दिलेल्या अनुभवाची चटके याप्रसंगी त्यांनी आपल्या दाटून आलेल्या मनातून निघालेला कंठ आणि डोळ्यातून वाहणारा पाण्याच्या धारा हे सर्व त्यांच्या मनातील व्यथा सांगून जात होत्या तसेच आज आम्ही या ठिकाणी टेलरिंगचे प्रशिक्षण घेत असताना बागुल सरांनी व मॅडमनी आमच्यावर स्वतःच्या मुली सारखे प्रेम केल्यामुळे आमचा प्रशिक्षणार्थेचा कार्यकाळ कसा निघून गेला तो कळलाच नाही आज आम्ही स्वतः वेगवेगळ्या टाईप मध्ये ब्लाऊज व नऊवारी साडी शिवणकाम करू शकतो व कुठेही आज आम्ही टेलरिंगचे स्वतःचे दुकान टाकू शकतो अशी ही खंबीर साथ बागुल सर व बागुल मॅडम यांनी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानणार नाही तर त्यांच्या ऋणात राहू इच्छितो असे या महिलांनी याप्रसंगी बोलून दाखवले. यावेळी संस्थेच्या २०० प्रशिक्षणार्थी महिला व मुली याप्रसंगी उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत बागुल यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या संचालिका राजश्री बागुल यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 8 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे