Breaking
कोपरगाव

कोपरगाव येथे मराठा वधू वर मेळाव्याचे आयोजन

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथे मोफत मराठा वधू वर परिचय मेळावा आयोजित केला असल्याची माहिती सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने विनय भगत व मराठा सोयरीक संस्थेचे संस्थापक अशोक कुटे यांनी सदर मेळाव्याचे आयोजन केले आहे सदरचा हा मेळावा मोफत असून हा ९५ वा मेळावा असून गुरुवार दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरांमधील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट हॉल मध्ये होणार आहे. तरी जास्तीत जास्त वधु-वर पालकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन विकास आढाव,भरत मोरे, अनिल गायकवाड,शिवाजी ठाकरे, अमित आढाव,ॲड. योगेश खालकर, अशोक आव्हाटे,बबलू वाणी,संदीप डुमरे,विजय जाधव,राजेंद्र वाकचौरे,मनोज नरोडे, विश्वास मुराडे,नंदू डांगे, वडांगळे सर,विनय भगत आदींनी केले आहे.या मेळाव्यासाठी येतांना वधू- वरांनी स्वतःचे आधार कार्ड झेरॉक्स, बायोडाटा घेऊन पालकांसह मेळाव्यास उपस्थिती दर्शवायची आहे तसेच या मेळाव्यामध्ये अनेक वेगवेगळ्या तालुक्यातील व वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्व प्रकारचे स्थळे या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी ९५९५२०३९९१ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे आज काल मुलांना लग्नांसाठी लवकर मुली मिळत नाही, त्यांचे लग्न जमत नाही. तसेच शेतकरी मुलांसोबत कोणीही लग्न करायला तयार होत नाही. आपले नातेवाईक मित्रपरिवार यांना देखील वेळ मिळत नसल्यामुळे कोणीही स्थळ दाखवण्यात आता मदत करत नाही.म्हणून अशा वधू वर मेळाव्यांची दिवसेंदिवस गरज पडत आहे. मराठा सोयरीक संस्थेने आतापर्यंत ९४ यशस्वी वधू वर मेळावे मोफत घेतले आहे. या संस्थेकडून आतापर्यंत ४५०० लग्न पार पाडलेले आहेत. त्यापैकी ६०० लग्न हे विधवा,विदुर, घटस्फोटीत यांचे पार पडलेले आहेत.धर्मादाय कार्यालयात नाव नोंदणी केलेली शासनमान्य अशी ही संस्था आहे.तरी या मेळाव्याचा जास्तीत जास्त वधू-वरांनी व त्यांच्या पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »