संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

संजीवनी अकॅडमीमध्ये माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंम्मेलन संपन्न

0 5 3 4 1 9

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

भविष्यातील आदर्श नागरीक घडविण्याकरीता पालक, समाज, शाळा , अशा अनेक घटकांचा समावेश असतो. शालेय जीवनात मुलं मुली वयाच्या संक्रमण अवस्थेमधुन जात असतात, म्हणुन पालकांनी आपल्या पाल्यांचे मित्र बणुन त्यांना समज द्यावी, तसेच त्यांच्यावर योग्य संस्कार मुल्ये रूजवावे, यामुळे ते भविष्यातील आदर्श नागरीक बनतील, असे प्रतिपादन जालना येथिल निसर्गाेपचार व आयुर्वेदेतील तज्ञ श्रीमती वर्षा पित्ती यांनी केले.संजीवनी अकॅडमीच्या माध्यमिक विभागाच्या वार्षिक स्नेहसंम्मेलनाच्या समारंभात पालकांसमोर श्रीमती वर्षा पित्ती प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलत होत्या. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हेेे, हेड ऑफ अकॅडमिक गव्हरर्नन्स डॉ. आर. एस. शेंडगे , हेड ऑफ इन्स्टिटयूट सर्विस प्रकाश जाधव, एक्झिक्युटिव्ह प्रिन्सिपाल रेखा पाटील, प्राचार्या शैला झुंजारराव, आदी उपस्थित होते. पालकांची उपस्थिती उल्लेखनिय होती.सांस्कृतिक कार्यक्रमात ‘गीता अमृतमः जीवन की संजीवनी’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत भगवतगीतेच्या विविध श्लोकांवर गीते, नाटीका, नृत्य सादर केले. यावर भाष्य करताना श्रीमती पित्ती म्हणाल्या की यातुन स्कूलने विद्यार्थ्यांमध्ये सात्विक, राजस (उत्साह,क्रियाशिलता, प्रेरणा यांसारखे गुण जे व्यक्तीला गतिशिल आणि प्रभावी बनवतात) गुणांची पेरणी करून भक्तीयोग, ध्यानयोग व निष्काम कर्म रूजविले आहे. स्कूलने विद्यार्थ्यांच्या मनात अध्यात्माचे बी पेरले आहे, आता पालकांनी पाल्यांना श्लोकांचा अर्थ समजावुन अध्यात्माच्या बीयांना पाणी देण्याचे काम करावे. मुलांमध्ये जोश असतो तेव्हा पालकांमध्ये होश असणे गरजेचे आहे. मुलं ही भारताचे भविष्य असतात, पालकांनी हे भविष्य संजीवनी अकॅडमीच्या माध्यमातुन योग्य हातात दिले आहे, असे श्रीमती पित्ती शेवटी म्हणाल्या.प्रारंभी स्कूलच्या एक्झिक्युटिव्ह प्रिन्सिपाल रेखा पाटील यांनी सर्व मान्यवरांचे व पालकांचे स्वागत केले. पाचार्या झुंजारराव यांनी वार्षिक अहवाल सादर केला.यावेळी अमित कोल्हे म्हणाले की संस्थेचे संस्थापक स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी ज्या हेतुने हे स्कूल स्थापन केले, तो हेतु संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सफल होत आहे. येथिल शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष देत असुन संजीवनी युनिव्हर्सिटीचा स्टाफ येथे येत असुन त्या स्टाफकडे असलेले ज्ञान व कौशल्ये येथिल मुलांना मिळत आहे.यावेळी विध्यार्थ्यांनी धार्मिक संकल्पनेवर सादरीकरण केले. तसेच गीतांसाठी लागणारी सर्व संगीताची वाद्ये चिमुरडयांनीच वाजुवन उपस्थितांची मने जिंकली. व्यावसायिक रंगभूमीला साजेसा रंगमच, उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था व लाईट इफेक्टस्, भव्य आसन व्यवस्था, विध्यार्थ्यांनीच सादर केलेल्या संगीतमय रचना, नृत्य, इत्यादींना रसिक प्रेक्षकांकडून प्रत्येक सादरीकरणानंतरची दाद, मराठी, हिंदी आणि अस्खलित इंग्रजी मधुन विध्यार्थ्यांनीच केलेले सुत्रसंचालन, या सर्व बाबींमुळे सांस्कृतिक कार्यक्रम संस्मरणीय ठरला, असे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 4 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे