संजीवनी अकॅडमीला ‘नॅबेट’ मानांकन प्राप्त

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी अकॅडमीला भारतीय गुणवत्ता परीषदेच्या (क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया) अखत्यारीतील नॅबेट (नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग ) मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनाने संजीवनी अकॅडमीच्या दर्जा व गुणवत्तेवर मोहर उमटली आहे. भारतात सुमारे १५ लाख शाळा आहेत, त्यापैकी सुमारे ७००० शाळा (०. ५ टक्के) नॅबेट मानांकित आहेत.यावरून संजीवनी अकॅडमी कोणत्या उंचीवर पोहचली आहे, याचा अंदाज येतो, अशी माहिती स्कूलने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात पुढे म्हटले आहे की नॅबेटच्या निकषांना सामोरे जाण्यासाठी संजीवनी अकॅडमीने आत्मविश्वासाने पाऊल टाकले. नॅबेट मुल्यांकन समितीने सर्व बाबींची पुराव्यासहित तपासणी केली. यात प्रामुख्याने स्कूल मधिल डीजिटल क्सारूमसह पुरेशा वर्ग खोल्या व अध्ययावत सामुग्रीसह प्रयोगशाळा ,

खेळाची मैदाने व साहित्य, विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात मिळविलेली बक्षिसे, स्कूलचा इ. १० वीचा १०० टक्के निकाल, गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या व त्यांचे शेकडा गुण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, त्यांच्या सुरक्षेसाठीची यंत्रणा, शिक्षकांचा अनुभव व त्यांची शैक्षणिक अर्हता, अशा अनेक बाबींचा समावेश होता. या नॅबेट मानांकनाने संजीवनी अकॅडमी ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शाळा ठरली आहे.संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी एक्झिक्युटिव प्रिंसिपाल रेखा पाटील, प्राचार्या शैला झुंजारराव, नॅबेट समन्वयक दिपाली बोर्डे, सर्व शैक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.