संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

संजीवनी इजिनिअरींग कॉलेजच्या वीस अभियंत्यांची फोर्स मोटर्स मध्ये नोकरीसाठी निवड

0 5 3 4 1 8

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अंतिम वर्षातील शेवटच्या सत्रातील परीक्षा अद्याप होणे बाकी आहे. मात्र अंतिम निकाला अगोदरच संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने फोर्स मोटर्स कंपनीचे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले आणि या ड्राईव्हमध्ये कंपनीने तब्बल वीस नवोदित अभियंत्यांची आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड केली, अशी माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.वाहन उद्योगातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपनीने निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये वैष्णवी संजय कदम, कल्पेश गोपालकृष्ण भालेरे, सागर ज्ञानेश्वर र भोजने, अभिषेक रावसाहेब गाडेकर, गौतम आप्पासाहेब गावडे, रोहित पांडुरंग जाधव, स्नेहल संजय वाबळे, अमित सचिन नागरे, ऋषिकेश वेणुनाथ गुडदे, अय्यान अल्लाबक्ष इनामदार, गितांजली रविंद्र पाठक, ऋतुजा दशरथ सांगळे, मोहम्मद जाकीयुसुफ शेख, प्रतिक भरत सोनवणे, सुयोग दिपक सोनवणे,वैभव सुदाम मते, प्रतिक संजय साळवे, रूपाली विठ्ठल थोट, प्रसाद शरद पवार व ऋषिकेश देविदास उराडे यांचा समावेश आहे. उद्योगांना अभिप्रेत असलेल्या तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रमात समावेश , इंजिनिअरींगच्या अगदी दुसऱ्या वर्षापासूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, उद्योग क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची मार्गदर्शनपर व्याख्याने, नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांचे अभ्यास दौरे, तांत्रिक बाबींचे इंग्रजी भाषेतून सादरीकरणाचा करून घेतला जाणारा सराव, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण प्रगतीसाठी शिक्षक आणि पालक यांच्यातील सुसंवाद, विद्यार्थ्यांच्या हजेरीबाबत कडक धोरण या सर्व बाबी व शेवटच्या वर्षात विद्यार्थ्यांकडून करून घेतला जाणारा मुलाखतींचा सराव,

जाहिरात
जाहिरात

यामुळे संजीवनीचे विद्यार्थी वेगवेगळ्या कंपन्यांच्या मुलाखतींना सहज सामोरे जातात, आणि आपल्या पालकांचे स्वप्न पुर्ण करतात. मागील वर्षी फोर्स मोटर्सने आठरा अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली होती. त्यांनी कंपनीच्या नियमानुसार उत्तम नोकरी केली, त्यामुळे फोर्स मोटर्सची संजीवनी बध्दलची विश्वासहर्ता अधिक बळावली आणि याही वर्षी वीस अभियंत्यांची निवड केली.संजीवनचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तर मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्वांचा सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. एम.व्ही. नागरहल्ली व विभाग प्रमुख उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 4 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे