एस.एस.जी.एम.कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव-सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे व रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स ॲण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन सोमवार दि.०६ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. सदर शिबिर हे कोपरगाव तालुक्यातील रवंदे या गावी वरील तारखेनुसार ‘युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी’ ही संकल्पना घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी सांगितले.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कोपरगाव तालुक्याचे कार्यक्षम आमदार आशुतोष दादा काळे यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब कदम हे लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड भगीरथ शिंदे, मा.सौ.चैतालीताई काळे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती) ॲड.संदीप वर्पे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), सुनील गंगुले(सदस्य, महाविद्यालय विकास समिती),

अरुण चंद्रे (सदस्य,जनरल बॉडी),अशोकराव मुरलीधर काळे (अध्यक्ष ,तंटा मुक्ती समिती रवंदे),अनिल बाळासाहेब कदम
(सदस्य,कर्मवीर शंकरराव काळे स.सा.कारखाना), श्रीमती शोभा भवर (सरपंच रवंदे) ऋषिकेश कदम (उपसरपंच रवंदे) आदी उपस्थित राहणार आहे.या शिबिरामध्ये श्रम संस्कारा बरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ‘ मृदा व जल व्यवस्थापन काळाची गरज’, ‘मी गोदावरी बोलते’, ‘ बालविवाह कायदेशीर गुन्हा’, ‘अक्षय ऊर्जा संवर्धन’, ‘स्वच्छता व आरोग्य’ यांसारख्या व्याख्यानांचे आयोजित करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी याबाबत माहिती दिली.