महाराष्ट्र

कोपरगावकर विजेच्या होणाऱ्या सततच्या लपंडावाने त्रस्त

0 5 4 1 2 9

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून सातत्याने दिवसभरा मध्ये एकदा तरी वीज पुरवठा खंडित होत असतो या विजेच्या होणाऱ्या खेळखंडोबा मुळे कोपरगाव शहरातील नागरिक हैराण झाले आहेत याबाबत कोपरगावकर नागरिकांनी अनेक वेळा महावितरणला पत्रव्यवहार करून देखील महावितरण यावर कुठलीही दखल घेत नाही सततच्या विज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढतच चालले आहे शनिवारी सकाळी दहा वाजता मेंटनस च्या नावाखाली जे लाईट बंद करतात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जर तुम्ही मेंटनसचे काम करतात तर वारंवार लाईट ब्रेक डाऊन का होते डीपीवरील फ्युज का उडतो असे अनेक प्रश्न विज ग्राहकांना पडले आहेत याबाबत विविध संघटनांनी पत्रव्यवहार करून आंदोलने देखील केली आहे मात्र महावितरणला कुठलेही सोयरे सुतक नाही पाऊस येतो पाच ते दहा मिनिट आणि लाईन जाते अर्धा तास याचं गणितच काही सर्वसामान्य वीज ग्राहकांना सुटत नाही सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहे त्यातच आज रक्षाबंधनाचा सण असल्याने मुख्य बाजारपेठेसह दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होत असतांनाच वीज वितरण कंपनीकडून विजेचा पुरवठा खंडित होण्याबाबत कोणताही आगाऊ सूचना ग्राहकांना दिली जात नाही शहरात दिवसभरात वारंवार अचानक वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे वीज उपकरणांचे नुकसान होत आहे याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन करावे अशी मागणी वीज ग्राहकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली आहे खंडित वीज पुरवठ्यामुळे लहान व्यवसायिकांचे देखील आर्थिक नुकसान होत असून कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवणारे दुग्धजन्य पदार्थ देखील खराब होत असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे तसेच शासकीय कार्यालय, बँका, टपाल कार्यालय येथील कामकाजावर देखील या खंडित वीज पुरवठ्याचा परिणाम होत असून नागरिकांना कामासाठी तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे सध्या सर्वत्र लाडकी बहीण योजनेचे काम सुरू असल्याकारणाने अचानक गेलेल्या लाईट मुळे महिलांना त्या कार्यालयामध्ये तासनतास उभे राहावे लागत आहे तसेच वीज अचानक ये-जा करीत असल्यामुळे विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन नागरिकांना आर्थिक भूृदंड सहन करावा लागतो तसेच वीज वसुलीसाठी ग्राहकांकडे वारंवार पाठपुरावा करणारे महावितरणचे कर्मचारी या खंडित वीज पुरवठ्याकडे का तेवढ्याच तत्परतेने बघत नाहीत असाही प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे तसेच वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणने तक्रार नोंद करण्यासाठी दिलेले मोबाईल नंबर हे लाईट गेल्यानंतर ग्राहकांनी फोन केल्यावर बंद दाखवतात किंवा फोन उचलत नाहीत तेव्हा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कोपरगावकरांचा जास्त अंत बघू नये असा निर्वाणीचा सल्ला कोपरगावकर नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे