माजी आमदार अशोकराव काळे साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक व कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोकराव काळे साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा व ३०० कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कर्मवीर मैदान कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड गौतम नगर पोस्ट कोळपेवाडी तालुका कोपरगाव या ठिकाणी बुधवार दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. नामदार अजित दादा पवार तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित असणार आहे

त्यासोबतच प्रमुख उपस्थिती मध्ये आमदार शंकरराव गडाख माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार नरेंद्र घुले पाटील आमदार माणिकराव कोकाटे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आमदार किशोर दराडे आमदार डॉ.किरण लहामटे आमदार संग्राम जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे तसेच या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी सर्व पक्षांमध्ये असलेले त्यांचे हितसंबंध व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष दादा अशोकराव काळे व माजी आमदार श्री अशोक दादा काळे मित्र मंडळ गौतम नगर यांनी केले आहे.