कोपरगांव तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी नितीन निकम यांची नियुक्ती

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी अहमदनगर यांच्या वतीने गुरुवार दिनांक २५ जुलै , २०२४ रोजी कोपरगांव येथील तालुका क्रीडा संकुल येथे तालुका क्रीडा शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते
अहमदनगर जिल्हा प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारी व तालुका क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांनी सदर बैठकीला उपस्थित होते याप्रसंगी क्रीडा शिक्षक,मार्गदर्शक, संघटनांचे प्रतिनिधी यांना यावेळी मार्गदर्शन केले तसेच तालुकास्तरावर घ्यावयाच्या विविध स्पर्धा व संबंधित तयारी याबाबत आवश्यक सुचना दिल्या .तसेच सर्व उपस्थित क्रीडाशिक्षक यांच्याशी चर्चा करून सर्वांच्या संमतीने सन २०२४.२५ या शैक्षणिक वर्षासाठी शालेय शासकीय स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कोपरगाव तालुका क्रीडा समिती कार्यकारणी यावेळी जाहीर केली यामध्ये अध्यक्षपदी नितीन निकम तर उपाध्यक्ष निलेश बडजाते,सुधाकर निलक,अजित पवार, संजय अमोलिक तर सचिव व तालुका प्रसिध्दी प्रमुख- अनुप गिरमे सहसचिव देवेंद्र भोये, रविंद्र नेदरे, मिलिंद कांबळे,भीमाशंकर औताडे , आकाश लकारे (पंच संघटना प्रतिनिधी ) तर सदस्य अशोक गायकवाड, राजेन्द्र देशमुख, शिवराज पाळणे, रामदास गव्हाणे , विरूपक्ष रेड्डी,किरण बोळींज तसेच महिला प्रतिनिधी म्हणून कु.अस्मिता रायते तर जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रतिनिधी शिवप्रसाद घोडके यांची निवड जाहीर करण्यात आली याप्रसंगी कोपरगांव क्रीडा समितीचे जेष्ठ मार्गदर्शक अहमदनगर जिल्हा शारीरिक व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण चंद्रे, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित क्रीडा मार्गदर्शक दिलीप घोडके, माजी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर,प्रा.अंबादास वडांगळे,सुभाष पाटणकर, नारायण शेळके,राजेंद्र पाटणकर,चंद्रकांत शेजुळ हे जेष्ठ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तसेच यावर्षी २०२४ या शैक्षणिक वर्षीत सेवानिवृत्त झालेल्या मकरंद कोऱ्हाळकर, नारायण शेळके, चंद्रकांत शेजुळ, राजेंद्र पाटणकर यांचा तालुका क्रीडा समितीच्या वतीने भाऊराव वीर यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे ऑफिसर प्रकाश जाधव हे उपस्थित होते यावेळी या सह विचार सभेला तालुक्यातील विविध शाळेतील तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक मार्गदर्शक उपस्थित होते तसेच नवनिर्वाचित समितीच्या माध्यमातून महत्वाच्या नवनवीन योजना संदर्भात चर्चा करून भविष्यात चांगले खेळाडू घडवण्यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करावे त्यानंतर नवीन कार्यकारणी अध्यक्ष व सर्व सदस्यांचा सन्मान करुण पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.