कोपरगावकंर सततच्या लाईट ट्रिपिंग मुळे हैराण ! उन्हाळ्यात अशी परिस्थिती तर पावसाळ्यात काय होणार !!

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव शहरात सतत भर उन्हाळ्यात कधी दिवसा तर कधी रात्रीच्या वेळी होणारी सततची लाईन ट्रीपिंग मुळे कोपरगाव शहरातील ग्राहक मोठे त्रस्त झाले आहे सध्या उन्हाचा पारा 40° कडे वाटचाल करत असताना मात्र महावितरण ग्राहकांना लाईट ट्रिपिंग पासून दिलासा देण्यात मात्र अधिकारी व कर्मचारी कसूर करताना दिसून येत आहे आज सोमवार २७ मे २०२४ रोजी दुपारी इंदिरानगर हनुमाननगर या उपनगरांमध्ये नगरपरिषदेने पाणीपुरवठा केला असता अगदी पाणी येण्याच्या वेळेसच महावितरण ने लाईट ट्रीपिंग झाल्यामुळे ८-१० दिवसांनी मिळणारे पिण्याचे पाणी भरण्यासाठी लाईट नसल्यामुळे मोटार लावता न आल्याने अनेकांना पाणी भरतांना मोठी कसरत करावी लागली दुपारी तीन वाजेच्या दरम्यान गायब झालेली लाईट सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत देखील आलेली नाही याबाबत महावितरणच्या लाईट तक्रार क्रमांकावर संपर्क केला असता संबंधित लाईनमन अथवा वायरमन म्हणाली की वरून लाईट गेली आहे कधी येणार सांगता येत नाही
तर सततच्या लाईन ट्रीपिंग मुळे ग्राहकांच्या घरातील टीव्ही फ्रिज कुलर कॉम्प्युटर फॅन अचानक होणाऱ्या ट्रिपिंग मुळे हि इलेक्ट्रिक उपकरणे खराब होत आहे मात्र याचे महावितरण ला काहीही सोयरे सुतक नाही जर महावितरण ग्राहकांकडून वीज वसुली सक्तीने करते तर महावितरण ने ग्राहकांना देखील सक्तीने सेवा चांगली दिली पाहिजे असा सूर सामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे तेव्हा सध्या उन्हाळ्यात होणाऱ्या लाईट ट्रिपिंग मुळे कोपरगावकरांना कधी दिलासा मिळणार ? महावितरण आपल्या कर्तव्याप्रती कधी जागरूक होईल ? कोपरगावकरांना सुरळीत वीज पुरवठा कधी होणार असे अनेक प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे.