कोपरगाव मतदार संघातील केटीवेअरच्या संरक्षक भिंतीसाठी १९.६३ कोटीच्या निधीस प्रशासकीय मंजुरी-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव मतदार संघातील विविध कोल्हापूर टाईप बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून मतदार संघातील चार केटीवेअरच्या संरक्षण भिंत बांधणेसाठी १९.६३ कोटी निधीस महायुती शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदार संघात सिंचनासाठी पाण्याची निर्मिती करण्यासाठी कोपरगाव मतदार संघातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर शासनाच्या मंजुरीतून ठिकठिकाणी कोल्हापूर टाईप बंधारे बांधण्यात आले आहेत. या कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात पावसाळ्यात गोदावरी नदीला वाहून जाणारे पाणी पावसाळयाच्या शेवटी अडवून नदीकाठच्या शेतकऱ्यांना व परिसरातील पाच दहा किलोमीटर पर्यतच्या शेतकऱ्यांना देखील शेती सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होवून भू-गर्भातील पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत होत आली आहे. परंतु जवळपास दोन ते तीन दशकापूर्वी बांधण्यात आलेल्या या काही बंधाऱ्याच्या बाजूचे भराव पाणी साठविल्यामुळे काहीसे कमकुवत होवून त्याठिकाणी पक्के बांधकाम करणे गरजेचे होते. जेणेकरून पूर परिस्थितीमुळे पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जावून शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये, तसेच या बंधाऱ्यांना कोणतीही हानी पोहोचू नये व या बंधाऱ्यांचे नुकसान होऊ नये व यासाठी निधी मिळावा याबाबत आ.आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेवून महाराष्ट्र राज्य आपत्ती सौम्यीकरनांतर्गत राज्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून राज्यातील आपत्ती सौम्यीकरनांतर्गत कोपरगाव मतदार संघातील डाऊच केटीवेअरच्या दोन्ही बाजूच्या संरक्षण भिंती, हिंगणी केटीवेअरच्या दोन्ही बाजूच्या संरक्षण भिंती तसेच शिंगवे व पुणतांबा केटीवेअरच्या संरक्षण भिंतीच्या कामासाठी एकूण १९.६३ कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा ना.अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे. या चार केटीवेअरच्या संरक्षण भिंतीच्या कामासाठी निधी मिळाल्यामुळे पूरपरिस्थितीत निर्माण होणारी आपत्ती सौम्य होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे होणारे नुकसान देखील कमी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.