कृषिमंत्री खेळतात रमी कुठे आहे विकासाची हमी अशा घोषणा देत शिवसैनिकांचा कोपरगाव तहसील समोर खेळला पत्त्याचा डाव

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहर व तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले, त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने सोमवारी कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारमधील भ्रष्ट व कलंकित मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी याबाबत एक निवेदन देण्यात आले याप्रसंगी कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी एकत्र येत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा नेऊन राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी कलविंदरसिंग डडियाल तालुका प्रमख गंगाधर रहाणे व संजय दंडवते, ग्राहक कक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद सिनगर, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,शहर प्रमुख श्री सनी वाघ, विधानसभाप्रमुख किरण खर्डे,शेतकरी सेना तालुकाप्रमुख धर्मा जावळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सिद्धार्थ शेळके, युवा सेना तालुकाप्रमुख विजय गोरडे,
युवासेना शहर प्रमुख शेखर कोलते.

आरोग्य सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके.भंडारा-गोंदिया विधानसभेचे संपर्कप्रमुख प्रवीण शिंदे,मनोज कपोते, युवासेना उपशहरप्रमुख सोनु आव्हाड,विजय भोकरे,ज्ञानेश्वर गोसावी,उप शहर प्रमुख विकास शर्मा,उपशहर प्रमुख आशिष निकुंभ, बालाजी. गोरडे,मधुकर पवार, सचिन आढाव, संदिप देवरे,ग्राहक सेनेचे उपजिल्हाप्रमुख अशोक पवार, वसीमभाई शेख, सनी खैरे,राहुल सटोटे, दिनेश भालेराव,तुषार आढाव,किरण व्यवहारे,अमित निकम,महेश गायकवाड,
संतोष साठे,सचिन नजन, विशाल नजन, ग्रामीणचे उत्तम जाधव, मच्छिन्द्र देवकर, रिंकेश जाधव यांच्यासह कोपरगाव शहरातील आजी-माजी पदाधिकारी, तालुक्यातील सर्वं नवनिर्वाचित गटप्रमुख व गणप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.