शिवसेना उपशहर प्रमुख प्रफुल्ल शिंगाडे यांचे दुःखद निधन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील युवा भीमसैनिक व कोपरगाव शिवसेना ठाकरे गटाचे कोपरगाव उपशहर प्रमुख प्रफुल्ल शिंगाडे यांचे रविवार दिनांक २९ जून रोजी दुपारी कोपरगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबाचा आधार आणि मुलांचे पितृछत्र हरपले आहे या घटनेमुळे कोपरगाव शहरासह तालुक्यात भीमसैनिक व शिवसैनिकांमध्ये शोककळा पसरली असून ते स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती शेवटच्या श्वासापर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारा शिवसैनिक म्हणून त्यांनी काम केले. सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच ते मदत करत असतं व ते एक स्मितभाषी म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या जाण्याने शिंगाडे परिवार तसेच खरात परिवार यांच्यासह नातेवाईक मित्र परिवारांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच त्यांचा जलदान तथा पुण्यानुमोदन विधी शनिवार ५ जुलै २०२५ रोजी लुंबिनी बुध्द विहार गोदावरी नदी मोठ्या पुला जवळ कोपरगाव संपन्न होणार आहे.