सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात एम.ए.एम.कॉम.एम.एस्सी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू – सौ.चैतालीताई काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कला,वाणिज्य, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी कायमच्या दूर झाल्या असून कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी एम. ए., एम. कॉम.,एम. एस्सी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले असल्याची माहिती संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांनी दिली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशातून स्व.सुशीलामाई काळे यांच्या आग्रहखातर मा.खा. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी कोळपेवाडी येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरू केले मागील जवळपास २५ वर्षापासून या महाविद्यालयाने अनेक विद्यार्थिनींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले असून कित्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी उच्च पदावर कार्यरत आहेत.विद्यार्थिनींचे उच्चशिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊन विद्यार्थी-विद्यार्थिनींना पदवी प्राप्त होवून हजारो विद्यार्थिनींचे भविष्य उज्वल झालेले आहे.परंतु ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे होते मात्र त्या ते विद्यार्थी-विद्यार्थिनी कोळपेवाडी परिसर सोडून बाहेरगावी जावून पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकत नव्हते. अशा विद्यार्थी-विद्यार्थिनींना मात्र आपले शिक्षण पदवीपर्यंतच सीमित ठेवावे लागत होते.

ही अडचण ओळखून महाविद्यालय व्यवस्थापनाने कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. आ.अशोकराव काळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्यातून सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. यामध्ये विज्ञान विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार असून तो अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे. विज्ञान व तंत्रज्ञान-एम.एस्सी. बॉटनी तसेच एम.एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री व मानवविज्ञान, कला विभागात एम.ए.इतिहास या अभ्यासक्रमासाठी आणि वाणिज्य व व्यवस्थापन-एम.कॉम. अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले आहेत.या संधीचा सर्व पदवीधारक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लाभ घेऊन आपले पदव्युत्तर शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन सौ.चैतालीताई काळे यांनी केले आहे.कोळपेवाडी सारख्या ग्रामीण भागात पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध झाल्यामुळे पालक वर्गांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून विशेषता विद्यार्थिनींच्या पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.