विवेकभैय्या कोल्हे यांच्या मागणीनंतर शासनाकडून ५०% युरिया बफर स्टॉक रिलीज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
खरीप हंगाम सुरू होताच कोपरगाव तालुक्यासह राज्यभरातील शेतकरी बांधवांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. मात्र, याच निर्णायक टप्प्यावर युरिया खताचा तुटवडा जाणवत होता. वेळेवर खत न मिळाल्यास पिकांची वाढ आणि उत्पादन यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. ही बाब ओळखून कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शासनाकडे युरिया बफर स्टॉकपैकी किमान ५०% स्टॉक तत्काळ रिलीज करण्याची ठाम मागणी केली होती.या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आता युरिया बफर स्टॉकपैकी ५०% स्टॉक वितरीत करण्यास अधिकृत मंजुरी मिळाली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना वेळेवर खत मिळून खरीप पिकांची योग्य वाढ सुनिश्चित होणार आहे.

तालुक्यातील अनेक शेतकरी युरिया टंचाईमुळे चिंतित होते, मात्र कोल्हे यांच्या वेळेवरच्या पाठपुराव्यामुळे ही समस्या दूर झाली आहे.या निर्णयाबद्दल मा.कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शासनाचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. शेतकऱ्यांचे हित हेच माझे प्रमुख उद्दिष्ट असून, वेळेवर खत उपलब्ध होणे हे पेरणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाने यासाठी तातडीने निर्णय घेतला याबद्दल मी कृतज्ञ आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरला असून, आता खरीप हंगाम सुरळीत पार पडण्यास मोठी मदत होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, कोल्हे यांच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.