Breaking
कोपरगाव

कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा व कुत्र्यांचा हैदोस नागरिक त्रस्त नगरपरिषदेची उदासीनता

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव शहरातील मेन रोड सह प्रभागा मधे तसेच महत्त्वाच्या रोडवर मोकाट जनावरांचा व मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे नागरिकांना दिवसेंदिवस या त्रासाला सामोरे जावे लागत आहे शहरातील अनेक पशुपालक आपली जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडून देत असल्याने ही जनावरे दिवसा ऐन चौकात रस्त्याच्या मध्यभागी किंवा वर्दळीच्या ठिकाणी दहा पाच गायां ठिय्या मारून बसलेल्या असतात तसेच सकाळी शाळा कॉलेज व ऑफिसची वेळ असल्याने या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो यातून वाट काढत नागरिकांना पुढील प्रवास करावा लागतो तर काही

वेळा जनावरांच्या भांडणामुळे यापूर्वी अनेक दुचाकी स्वारांचा या मोकाट जनावरांच्या त्रासामुळे किरकोळ स्वरूपात अपघात झालेले आहेत यावर कोपरगाव नगरपरिषद प्रशासन या जनावरांच्या बंदोबस्त करण्यासाठी कमी पडल्याचे दिसून येत आहे दुसरीकडे नगर परिषदेचा आरोग्य विभाग म्हणतो आम्ही सदरची जनावरे पकडण्याची मोहीम वेळोवेळी राबवत असतो तरी देखील शहरातील अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर मात्र जनावरांच्या व कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसून येत आहे तसेच रस्त्यावर पडलेल्या जनावरांची विस्टा त्यावरून दुचाकी वाहन घसरून अनेक दुचाकी स्वारांचा अपघात घडला आहे ही बाब कोपरगाव करांन साठी मोठी डोकेदुखीत भर घालणारी ठरत आहे तसेच विशेषतः शहराच्या सीमा वरती भागात मोकाट जनावरांचा त्रास अधिक आहे

यामध्ये गांधीनगर,राम मंदिर रोड, छत्रपती संभाजी महाराज सर्कल, धांरणगाव रोड, तहसील कार्यालय परिसर, गुरुद्वारा रोड, टिळकनगर, पावर हाऊस, मेन रोड, अहिंस्ता स्तंभ या भागात मोकाट जनावरे उभी असतात याबाबत योग्य ती कारवाई नगरपरिषद प्रशासन करीत नसल्यामुळे नागरिकांना दिवसेंदिवस या मोकाट जनावरांचा व कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्यावर कुठे नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे होते व तात्पुरती कारवाई करते नंतर पुन्हा स्थिती “जैसे थे” होते त्यामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने मोकाट जनावरांबाबत ठोस उपाययोजना करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोपरगाव शहरातील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »