ज्येष्ठ नागरिक मंचच्या वतीने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचा सत्कार संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
ज्येष्ठ नागरिक मंच व जेष्ठ महिला समिती यांच्या वतीने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे नव्याने पदभार स्वीकारलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी जेष्ठ नागरिकांनी मागील २५ वर्षा पासून ते आजतागायत पर्यंत ज्येष्ठ नागरिकांनी समाजासाठी राबवलेले विविध उपक्रम याचा संपूर्ण लेखाजोखा या प्रसंगी डॉ.विलास आचारी यांनी सांगितला तसेच ज्येष्ठ नागरिक मंच व ज्येष्ठ महिला समिती यांच्या वतीने
आनंदऋषींजी हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर अहिल्यानगर यांच्या मदतीने कोपरगाव शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीने धर्मार्थ दवाखाना चालविल्या जात असून यामध्ये येणाऱ्या पेशंटला मोफत औषध उपचार दिले जातात तसेच शिबिराचे आयोजन करून मोतीबिंदू असलेल्या पेशंटची मोफत तपासणी करून त्यांना अहिल्यानगर येथील आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये नेऊन तेथे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करून तसेच त्या पेशंटची राहण्याची व जेवणाची मोफत सोय करून त्यांना पुन्हा कोपरगाव शहरात आणण्यापर्यंतची संपूर्ण सोयी सुविधा ज्येष्ठ नागरिक मंच करत आहे तसेच जेष्ठ नागरिकांचे वाढदिवस देखील मंचाच्या वतीने साजरे केले

जातात तसेच विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणारे राजकीय सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक तसेच विविध पदावर असलेले सरकारी अधिकारी यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक मंचच्या वतीने आम्ही करत असतो यातून या नवीन पिढीला चांगले प्रोत्साहन मिळावे व ते अधिक गतीने समाजाच्या कामासाठी आपला अधिकचा वेळ देतील त्यामुळे आम्ही जेष्ठ नागरिक अशा विविध संकल्पना राबवत असतो तसेच आपण आपल्या पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्हा जेष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या नियमाप्रमाणे असलेल्या सोयी सुविधा व संरक्षण याबाबत आपण जेष्ठांना सहकार्य करावे अशी माफक अपेक्षा ज्येष्ठ नागरिक मंचाचे कार्याध्यक्ष विजयजी बंब यांनी व्यक्त केली याप्रसंगी जेष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे, रजनीताई गुजराथी,जयश्रीताई अमृत शहा, जवाहरलालजी शहा विजयजी बंब योगाचार्य उत्तमभाई शहा, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव कपिले डॉ.विलास आचारी,जगमोहन चिकटे, अंबादास आढाव तिवारी मामा मधुकर कदम योगेशजी जोबनपुत्रा आदी याप्रसंगी उपस्थित होते.